मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबी.

नूतन सावंत · · पाककृती
कोलंबीची निर्मिती करताना परमेश्वर नक्कीच खुशीत असला पाहिजे.त्याशिवाय इतकी सुंदर निर्मिती होत नाही.आणि जसे,’पानी रे पानी तेरा रंग कैसा,जिसमे मिलादे मुझे उस जैसा.’ तशीच कोलंबीही ज्या मसाल्यासोबत कराल त्याच्याशी जमवून घेत स्वतःची चव,’बिलकुल उस जैसी ’करून सोडते.कमीत कमी मसाले हेही या कोलंबीच्या तिसऱ्या अध्यायाचे वैशिट्य,तळलेली कोलंबी तुम्ही खूप खाल्ली असेल .एकदा या पद्धतीने करून पहा.पुन्हा पुन्हा करावीशी आणि खावीशी वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते.अतिशय उत्तम स्टार्टर. माझ्या एका सारस्वत मैत्रिणीची आई याबाबतीत माझी गुरु.अतिशय कमी तेल हा पण या पाककृतीचा खास विशेष गुण.चला तर तुमच्या तोंडाला वर्णनानेच पाणी सुटण्याची वाट न पाहता मी कृती सांगायला सुरुवात करते.चला तर साहित्य गोळा करा. साहित्य:- हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबी. १. २० कोलंब्या. . २. अर्धी वाटी कोथिंबीर+दोन हिरव्या मिरच्या+पेरभर आले+१५/२० लसूणपाकळ्या. . . ३. एक चहाचा चमचा चिंचेचा कोळ. ४. चवीनुसार मीठ. . ५. तेल. . कृती:- १. कोलंबी सोलून ,काळा धागा काढून धुवून घ्यावी. फोटो खाली दिला आहे.. २. कोथिंबीर+मिरच्या+आले+लसूण+काळीमिरी बारीक वरून घ्यावे, पाणी न घालता वाटायचे, हे लक्षात ठेवायचे.धुतलेल्या कोथिंबीरीचा ओलावा पुरतो. . . ३. हे वाटण+चिंचेचा कोळ +मीठ एकत्र करून कोलंबीला चोळून १५ ते २० ठेवावे. . ४. नॉनस्टिक तव्यात दोन चहाचे चमचे तेल घालून तवा फिरवून ते सगळीकडे पसरवून घ्यावे. ५. तेल चांगले गरम झाले की,त्यात कोलंब्या रचाव्यात. पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवाव्या,पाच मिनिटांनी झाकण कडून उलटाव्यात.आता झाकण नाठेवता दुसरी बाजू होऊ द्यावी.सगळे पाणी आटले की गॅस बंद करावा.ही कोलंबी कडक तळायची नाही,एवढे लक्षात ठेवायचे. . . . ६. पुढची कृती सांगायची गरज मला वाटत नाही,ती तुम्हाला चांगलीच माहिती आहे.करा तर सुरुवात. .

वाचन 16256 प्रतिक्रिया 0