मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ते ९६ भाग

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बाबा, गांधीवाद म्हणजे काय? रात्री ९.३० वाजता चिरंजिवांनी घरात गेल्या गेल्या प्रश्न विचारला. अरे, आपण उपवनात गेलो होतो तेंव्हा तळ्यात दोन बदके क्वॅक्,क्वॅक असा आवाज करत विहार करत होती, त्यांतले अत्यंत पांढरे शूभ्र बदक म्हणजे गांधीवाद. आणि त्याच्याबरोबर अंगावर काळे पट्टे असलेले आणखी एक बदक म्हणजे संधीवाद. गांधीवाद म्हणजे "अहिंसा परमो धर्म "ह्या मुख्य सुत्रावर आधारित आपण भारतियांनी दैनंदिन जिवनात कसे आचरण करावे ह्या बाबतीत महात्मा, राष्ट्रपिता मोहनदास गांधींनी केलेले विस्तृत विवेचन म्हणजे गांधीवाद. आता काही दिवसांनी "आपण अतिरेकीग्रस्तांच्या पाठीमागे कसे उभे राहिलो ह्याच्या विविध लोकांच्या वाहिनी वरच्या चित्रफिती कम जाहिराती म्हणजे संधीवाद. पण इस्रायल ह्या देशातील आपल्या बांधवाना अशी मदत करणारे अमेरिकन ज्यू अशी जाहिराती ची संधी का साधत नाहीत हा प्रष्न चिरंजीवांनी विचारल्यावर मात्र मास्तर निरुत्तर झाले. असो. सध्या मिपावर के कारान्त भाग मालिका सुमारे १०० हुन अधिक भाग चालणार आहे असे खात्रिलायक सुत्राकडुन स॑मजते. मास्तरांनी आधीचे ३ भाग आणि त्यावरिल प्रतिक्रिया वाचल्या होत्या. हुशार सदस्याने सुमारे ९०% लोकांचा ह्या मालिकेतील विचारांना विरोध आहे हा विदा लगेच सादर केला होता. ३ भागातच मनाने सिक झालेली सद्स्यांची मानसिकता बघुन मास्तरांनी स्ट्रेस बस्टर ही मालिका सादर करायचा निर्णय जाहीर केला. एकंदरीत परिस्थीती बघता ह्या १०० किंवा अधीक भागानंतर मिपा वरच्या सदस्यांची अवस्था काय होईल हे विचार मास्तरांच्या अमंळ मंद झालेल्या डोक्यात चमकायला लागले. सर्वात पहिल्यांदा मास्तरांना विचार आला तो अफ्रिका खंडातील त्यांच्या जिवलग विद्यार्थ्याचा. ह्या विद्यार्थ्याचे १०० भागानंतर संपूर्ण मतपरिवर्तन झालेले असेल. अंगावर संपुर्ण खादी वस्त्र चढवून हा विद्यार्थी गेटवे ऑफ इंडीयाच्या कट्ट्यावर उत्तर दिशेला तोंड करुन बोटीची वाट बघत बसलेला असेल. एका हातात "वैशणव जन तो तेने कहीये" ची सांवंत कन्येवर चित्रीत केलेली रीमिक्स सी.डी असेल व दुस-या हातात गुलाबाचे हार असतील. हे हार तात्याबा नी पुरस्कृत केलेले असतील. वेताळ आजुबा़जूला "आप आये , बहार आयी" हे गाणे म्हणताना दिसेल. ह्या १०० भागानंतर इतर सर्व सदस्यांवर काय परिणाम होतील ह्या बाबतीत आपल्या कल्पना काय आहेत ह्यावर चर्चा अपेक्षित. जाता जाता: रामदास हा एक क्रुर मुनिवर्य आहे. त्यांनी राहिलेले ७ फोटो फक्त मास्तरांना दाखवले. ते बघाल तर ????????????????????????????????????

वाचन 4392 प्रतिक्रिया 0