मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपासार

माम्लेदारचा पन्खा · · जे न देखे रवी...
(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता…. भले शाब्बास ) तुम्ही जे काही स्कोर सेटल केलेत तेही इथेच केलेत ! (कशी जिरवली !!!) तुमची मिपावर असताना आज जशी अवस्था आहे…( संदिग्ध, भ्रमिष्ट,नादिष्ट,छांदिष्ट वगैरे वगैरे ) तशीच काल दुसर्या कोणाचीतरी होती…. आणि तशीच उद्या नवीन मेम्ब्रांची असेल… चिखलात असूनही कमळासारखे राहणे हा मिपाकरांचा नियम आहे !!

वाचन 6832 प्रतिक्रिया 0