मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग १

गवि · · काथ्याकूट
सदस्यहो.. हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या सतत ऐकू येतात. अनेकदा एखादी बातमी खूप इंटरेस्टिंग असते आणि कोणाशीतरी ती शेअर करावीशी वाटते. पण खूप लिहायला वेळ नसतो. खूप लिहायला एकदम सुचतही नाही. पण मित्रांमधे बातमीचा उल्लेख केला की सर्वांची मिळून त्यावर चर्चा रंगते. मॅगीबंदी असो किंवा म्यानमारमधली कारवाई..(ती आपल्याच हद्दीत झाली म्हणे).. इत्यादि.. बातमीचा मजकूर , हेडलाईन, आणि तिची मूळ लिंक शेअर करणं.. तसंच त्यावर वेगवेगळे दृष्टिकोन असलेल्या लोकांना आपापली मतं देता येणं या कारणांसाठी कोणीही या धाग्यात बातमी आणि प्रतिसाद लिहू शकेल. वाचनाच्या सोयीसाठी शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यावेळच्या एखाद्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच नवा भाग सुरु करण्यात येईल. सध्या मुंबईत ईस्टर्न फ्रीवेवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जबरदस्त अपघाताची बातमी चर्चेत आहे. मॅगी थोडीथोडी मागे पडते आहे. म्यानमारच्या हद्दीत लष्करी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे नेते आता इतर "शेजारी देशांना" गर्भित इशारे देताहेत. हे आधीपेक्षा वेगळं धोरण असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात सुटी सिगरेट विकण्यावर बंदी आली आहे. चांगलं आहे. बाकी जगात काय विशेष ?

वाचन 36794 प्रतिक्रिया 0