फेव्हीकॉलची विचारसरणी
बास्स्स !! आता लैच झालं !!
मी खरं तर ह्या असल्या विषयावर लिहिणारच नव्हतो , त्यात मला काही गती नाही आणि रसही.
पण च्यायला जो तो उठतो सुटतो आणि हे करा न ते करा ... म्हणजे आतंकवादी(पाकिस्तान) सुधारेल असे सांगत सुटतो.आता यातही मालिका सुरू झाल्यात ... आतंकवाद नष्ट करण्याचे उपाय - भाग १ ,... पाकिस्तान कसे सुधरवाल - भाग २५ ... अर्रे छोडो यार .. कोणी गांधीवाद करा म्हणतो, कोणी म्हणतो समजावून सांगा... कोणी म्हणतो आपण चर्चा करू .. कोणी नुसताच निषेध करतोय ...
अरे इतर वेळी त्या अमेरिकेला शिव्या देता ... काही चांगलं घ्या की त्यांच्या कडून .. ९/११ च्या हल्यानंतर काय पेटून उठला तो देश. अफगाणिस्तान, इराक अजून कोण शेंबडा-कोंबडा असेल तो ... पुर्ण सपाट करून टाकला.. आज त्यांची मान ताठ आहे, कोणी हल्ला करताना विचार करेल. अमेरिका पुर्ण अलर्ट आहेत.
डोक्यात जायचा अजुन एक मुद्दा, ते ह्युमन राईट्स वाले. आई शप्पथ हातात असता ना त्यांचा राईट हँड त्यांच्या **त घालून ठेवला असता,,, या आता राईट मागायला म्हणाव. ... च्यायला आणि आपलं पब्लिक ऐकतं तरी कसं ? मला जास्त सांख्यिकी नाही माहित पण संसद हल्ल्यातल्या आरोपी च्या बाजूने हे राईट वाले लढले, त्याची फाशी वाचवली. अरे लाज आहे का रे ? लाज ? ल ला काना 'ला' , 'ज' ... मला आज्जिबात शंका नाही, भारतावर जेवढे आतंकवादी हल्ले झालेत तेवढेच काय त्याच्या १०% पण अजुन कुठे झाले असतीत .. आणि याचं रुट फक्त आणि फक्त पाकिस्तानात आहे हे चड्डीत कार्यक्रम करणारं शेंबडं पोरगं पण सांगेल.
आपण नेहमी असा सोयिस्कर (आपण म्हणण्यापेक्षा 'मी' म्हणतो) विचार करतो , मी एका सेफ जागेत रहातो, माझा ना कोणी पॉलिटिक्स मधे , ना पोलिसात , ना सैन्यात ... आपला तर या गोष्टीशी काहीही संबंध नाही... मी कशाला माझी लाल करून घेऊ ? हे तर रोजचंच झालंय .. माझ्या हातात काय आहे? मी काय करू शकतो ? असली धृतराष्ट्र छाप सोयिस्कर समजूत आपण करून घेतो.. आणि गप्पगार होतो. हा मोठाल्या चर्चा करायला मात्र आपण सर्वांत पुढे. आपण युं केलं पाहिजे , त्यूं केलं पाहिजे. म्हणजे असं होईल तसं होईल .. पण फक्त एक विचार मनात येतो, आज जर माझा कोणी त्या हल्ल्यात गेला असता तर ? ( आणि हल्ले थांबलेत असं नाही.. होतीलच .... त्यामुळे आपला धोका टळलेला नाहीये) तर मग आपण लग्गेच काठ्या घेउन जागे झालो असतो. मग त्या अपराध्यांना सोडवणार्या ह्युमन राईटस वाल्यांचा आपल्याला राग आला असता ... मग आपण सरकारचा निष्क्रियते विषयी आवाज उठवला असता.. तर मग आपण जागे झालो असतो.. पण हे आपण आपल्या कोणाला तरी काही होई पर्यंत वाट पहावी का ? मी गेल्य वर्षी जेंव्हा हैदराबाद मधे होतो, तेंव्हाची गोष्ट, मी रहात असलेल्या हॉटेल पासून मोजून ५ मिनीटांच्या अंतरावर स्फोट झाले होते. आणि स्फोटांच्या वेळेस मी कामावरून घरी येउन थोडा फिरायला बाहेर पडत असे. आणि बाँबस्फोट झाले त्याच दिवशी सकाळच्या फ्लाईटने मी घरी आलेलो. त्या दिवशी फोन अक्षरशः कानालाच होता. मग याला मी माझे सुदैव म्हणून टाळून देउ का ? मी सुटलो ना .. चला आपण मोकळे आपलं गुलछबू लाईफ जगायला ... आपलीच चिड येते . आपल्याला काही सॉलिड करता येत नाही याचा खेद होतो.
आज तो गांधीवादाचा आणि अतिरेक्यांना समजवण्याचा मुद्दा वाचला आणि डोक्यात शॉटच गेला.( त्या गांधींबद्दलचा रोष जरा बाजूलाच ठेऊ, ते बिचारे तर सुटले, पण आपले बीज रोऊन गेले) युद्ध गांधीवादाने टळू शकतं का ? शकतं तर आपण इतके दिवस **त घालून शांत बसलेलो, निसते निषेध केले , अमेरिकेकडे रडलो .. ( हे सेम टू सेम माझ्या लहानपणची आठवण करून देणार, मी माझ्या छोट्या भावाची काही वस्तू घेतली तो भोकाड पसरायचा , आणि आइला नाव सांगायचा. हल्ली आपण अमेरिकेकडे जायचो.) चर्चा केल्या , आग्र्याला त्या हरामखोर मुशर्रफ ला बोलावला, इतकच काय दोन देशांतल्या येण्याजाण्याचं सोयिस्कर व्हावं म्हणून बस सुविधा सुरू केलेली ती आपणच... त्याला आपण गांधीवाद म्हणू की नाही ? काय *ट झालं त्यामुळे ? आणि आता नाकावर टिच्चून मुंबईवर हल्ले झाले तरी आपण त्याच पोकळ चर्चा करतो ? अरे आपण एवढे आंधळे गांधीवादी झालोय का ? नुसता गांधीवाद ?
जे औषध तापावर चालते तेच्च आपण जुलाबावर पण घेतो का ? मग नको तिथे गांधीवाद का मधे आणतो ? का आपल्या मानसिकतेला फिव्हिकॉल सारखा चिकटपणा आला आहे ?
तो आबा पाटील (आता आदरणिय नाही राहिला, सॉरी) ... तो रडकुंडीला आला होता... मुलाखत देताना... मागे फेयर अँड लव्हलीची ऍड करणारे छगन भुजबळ (तिर्थरुपांनी अगदी चपलख नाव ठेवलंय) ... अरे ज्याच्या कडे निर्णय घेण्याची जबाबदाती आहे, ज्याच्या कडे पॉवर्स आहेत ... तो शेंबड्यासारखा हातपाय गाळून रडायला लागला (आता ते अश्रू तरी ओरिजिनल होते का ? ) तर बाकी जनतेने काय करायचं ? निवडणूकांच्या वेळी हेच नेते "आपल्या वार्डाचे खंबीर आणि धडाडीचे नेतृत्व" असते. मला इथं राजकारणाविषयी बोलायची इच्छा बिलकूल नाही.. खरं तर हा लेखही लिहायची इच्छा नव्हती... पण रहावलं गेलं नाही...
आता कोणी गांधीवादाचं नाव काढेल तर त्यानेच अतिरेक्यांसमोर खादी घालून जावं ... आणि जाउनच दाखवावं इथं निसत्या चर्चा करू नयेत. तर मग त्यांच्यात खरोखर गट्स आहेत असं मान्य करायला हरकत नाही.
एक पुर्णपणे वैयक्तिक विचार : कोणाची ही परवानगी न घेता, पाकिस्तानात घूसून सर्व अतिरेकी प्रशिक्षण छावण्या उडवून लावाव्याय. पाकडे मधी आले तर त्यांचा पण सपाटा करावा. माहित आहे ह्यात आपलं पण नुकसान आहे. परंतू जर हे एकदाच केलं तर पुढचा त्रास टळेल.आर्थिक फटका बसेल पण भारत त्यातूनही सावरेल. नाही तरी ह्या आतंकवादी कारवायांमुळे किती नुकसान होतंय याचा ठोकताळाच नाहीये.
रोज मरण्यापेक्षा एकदाच राजासारखे जगून मरावे
ता.क. कोणी ही पर्सनली घेउ नये. कारण घेतलं तरी मला फरक पडत नाही.
वाचन
17111
प्रतिक्रिया
0