मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मटण सुप (अर्थातच आकर्षक छायाचित्रांसह)

पांथस्थ · · पाककृती
मटण खायचे तर आहे पण मसालेदार नकोय (फोटूंमुळे जळजळ होते मसाल्याने वाढायची ;) ), मग मटण सुप हा छान पर्याय आहे. आम्ही याला मोळं मटण पण म्हणतो. चला तर मंडळी साहित्य लिहुन घ्या - साहित्यः * १/२ किलो मटण (स्वच्छ धुऊन घ्या) * २ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरुन) * २ चमचे आलं-लसुण वाटण * ७-८ काळी मिरी * ४-५ लवंगा * २ दालचिनीचे तुकडे (१") * २ चमचे शहाजिरे * १-२ तमालपत्रे * १/४ चमचा हळद * ३-४ चमचे तेल (तेल कमी वापरलं तरी चालतं) आता कामाला लागा - कृती: १. कुकर मधे तेल गरम करुन त्यात सगळे मसाल्याचे जिन्नस तळुन घ्या. लवंग/मिरी तडतडली कि त्यात आलं-लसुण वाटण घालुन चांगले परतुन घ्या. २. कांदा घालुन मउ (किंवा मंद सोनेरी होऊ पर्यंत) परतुन घ्या. ३. हळद घालुन व्यवस्थित हलवा. ४. मटण घाला आणि व्यवस्थित हलवुन घ्या ५. मटण हलके गुलाबी होउपर्यंत परतुन घ्या ६. पाणि (३-४ लिटर) घालुन एक उकळी येउ द्या. कुकर बंद करुन तीन शिट्ट्या घ्या.
हे घ्या गरमा-गरम सुप पिउन घ्या. बाहेर छान पावसाळी वातावरण आहे आणि मस्त थंड हवा आहे.
१-२ वाट्या सुप ओरपुन झाले कि मस्त भातावर वाढुन घ्या. वरुन मस्त मिरी भुरभुरुन घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या. सर्दि-डोकेदुखी असेल तर कशी पळुन जाते पहा!!!

वाचन 11410 प्रतिक्रिया 0