मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अघोषित युद्ध..!

विसोबा खेचर · · काथ्याकूट
मुंबैवरचा आतंकवादी हल्ला अजूनही सुरूच.. ताजमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा फायरिंग ओपन केलं आहे.. छाबडा हाऊसमध्ये बेछुट गोळीबार.. तेथे एक इस्रायली कुटुंब ओलीस. नरिमन हाऊसमध्येही अतिरेकी घुसले आहेत..ओबेरॉय हॉटेलात लष्करी कारवाई जोरात सुरू.. मर्चंट हाऊसमध्येही अतिरेकी लपल्याची शंका.. विधानभवनासमोर दोन हॅन्ड ग्रेनेड मिळाले तेही पोलिसांनी निकामी केले आहेत...अतिरेक्यांकडे ग्रेनेड, एके ४७, एके ५७ यासारखी हत्यारे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज.. आता हा हमला केवळ मुबईवर नसून भारतावरच आहे, भारताच्या सार्वभौमत्वावर आहे! भारतावर अचानक लादलं गेलेलं हे अघोषित युद्धच म्हणावं लागेल... भारत याला पुरून उरेल याबद्दल शंका नाही.. जय हिंद.. तात्या.

वाचन 12723 प्रतिक्रिया 0