मिपाचे वैभव..!
लेखनप्रकार
राम राम मिपाकरहो..
नुकताच मिपाकर सुनील यांनी 'मिपाचे बंद पडणे..' अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीस तिथे आम्ही उत्तर दिले आहेच परंतु आमच्या उत्तराला सपोर्टिंग म्हणून आम्ही खाली काही चित्रे प्रकाशित करत आहोत.. या वरून मिपाची वाढती लोकप्रियता सहज लक्षात यावी..
आणि म्हणूनच आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण आणून मिपा वारंवार बंद पाडत आहेत हे उघड आहे...
असो, या बाबतीत शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. लौकरच मिपावरील या भ्याड हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यात येईल.. सर्व मिपाकरांनी आजपर्यंत जसे सहकार्य केले तसेच यापुढेही करावे अशी मायबाप मिपाकरांना कळकळीची विनंती...
हे पाहा मिपाचे वैभव...!
आपला,
(कृतज्ञ आणि कृतार्थ!) तात्या अभ्यंकर.
वाचन
10531
प्रतिक्रिया
0