स्वच्छंद - १
लेखनप्रकार
शहरात राहात असूनही सुदैवाने सकाळ उजाडते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुलची साद, दयाळचा सूर, इवल्याश्या सनबर्डसचा चिवचिवाट, तांबटाचा टिकटिकाट, देवकावळ्याचे घुमणे, किंगफिशरचा किर्किरात, चिमण्यांची चिवचिव आणि सर्वांवर टिपेला जाणारा पोपटांचा कलकलाट. तसे पोपट पूर्वीपासूनच आहेत पण गेल्या पाच एक वर्षात त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. निलगिरी, सुबाभुळ, शेकट, सोनमोहर अशा अनेक झाडांवर ही मंडळी वावरताना दिसतात. एकाने साद घालायची, तिघा चौघांनी प्रतिसाद द्यायचा, मग सर्वांनी कलकलाट करायचा आणि मग एकसमयाव्च्छेदेकरुन सर्वांनी थव्याने उडुन जायचे हा नित्यक्रम.
पक्षी हा मुक्त व स्वच्छंद विहरतानाच छान दिसतो. पक्ष्यांना पिंजर्यात डांबणे यासारखे क्रौर्य नाही. पोपट पिंजर्यात ठेवलेला पाहवत नाही. विशेषतः जेव्हा पोपटांना असे विहरताना पाहतो तेव्हा पिंजर्यातल्या पोपटांची फार दया येते. इथे दिसणारे पोपट हे एकत्र राहात असले तरी ते भिन्न प्रजातींचे असावेत. काही पोपट पोपटी हिरवे तर काही निळसार झाक असलेले. पिल्ले कंठ न फुटलेली व हलक्या पोपटी व पिवळसर रंगांची. यांनी घारींची फार भिती वाटत असावी. कावळ्यांचा उपद्रव तर असतोच. पण तरीही हे पोपट मोठ्या डौलात झाडांवर बसतात, रुबाबात वावरतात. लाल तुर्यांची फुले यांना नाश्त्याला फार आवडतात.
सकाळी काचा सरकावाव्यात तो फळांनी झाड लगडावे तसे पोपटांनी बहरलेले दिसते. पोपट घरटी करत नाहीत, ते ढोल्यांमध्ये राहतात असे ऐकुन आहे. पण सकाळी भल्या पहाटेपासून मंडळी झादावर वावरताना दिसतात. अनेक वर्षे वावरुन सरावलेले हे पोपट आता निर्धास्त पणे कठड्यावर वा छज्जावर येउन बसतात. वरुन खाली सरळ गेलेली डिशची केबल हा त्यांचा झोपाळा. या केबलवर लटकुन चौकसपणे घरात डोकावणे हा यांचा नित्यक्रम. आता सकाळी चिमण्यांना तांदूळ टाकण्याबरोबर पोपटांच्या लीला पाहणे हा एक नवा छंद जडला आहे. घरबसल्या टिपलेली ही काही चित्रे.
सकाळ झाली. झाड गजबजलं
"ऐकल का?' - बित्तंमातम्या सुरू
खबरबात कान देउन ऐकताना
"फोटो घेताय? घ्या"
कावळे वा घारीची चाहूल लागताच झेपावण्याच्या तयारीत
फांदीवर फिरताना
छोटु
कोवळ्या उन्हाच्या प्रतिक्षेत
परिसराची पाहणी
आळस! आज कामावर दांडी माराय्चा विचार दिसतोय
छोटू अजुन झोपेतून पुरता जागा झाला नसावा
फांदीवर बसून खालच्या झाडावरची पुले शोधताना
"सावधान' पवित्र्यात
उड्डाणाच्या तयारीत
उच्चावलोकन

"ऐकल का?' - बित्तंमातम्या सुरू
खबरबात कान देउन ऐकताना
"फोटो घेताय? घ्या"
कावळे वा घारीची चाहूल लागताच झेपावण्याच्या तयारीत
फांदीवर फिरताना
छोटु
कोवळ्या उन्हाच्या प्रतिक्षेत
परिसराची पाहणी
आळस! आज कामावर दांडी माराय्चा विचार दिसतोय
छोटू अजुन झोपेतून पुरता जागा झाला नसावा
फांदीवर बसून खालच्या झाडावरची पुले शोधताना
"सावधान' पवित्र्यात
उड्डाणाच्या तयारीत
उच्चावलोकन

वाचन
21230
प्रतिक्रिया
0