समुद्र
लेखनविषय:
तासंतास समुद्र प्यायलो मी,
दिवसभराचा सारा मुद्राभिनय,
तपशिलासकट, थोडा-थोडा करून...
बराच समुद्र प्यायलो मी.
समुद्र....
स्वत:हुन जवळीक साधत,
पायांशी घोळणारा...
अथवा, सगळी गरळ मागे टाकुन,
कोरडा निघून जाणारा.
सारे ढग हाकून थकल्यावर,
सूर्य गिळायला मोकळा झालेला..
लाल समुद्र.
एक दिवसाचा समुद्र फाडून ओतला
डोळ्यांमध्ये, मावळत्या तप्त सुर्यासकट.
खारट समुद्र,
वाहत राहिला बंद डोळ्यांमधून,
बराच वेळ...
सूर्य मात्र,
विनासायास ह्रदयापर्यंत गेला.
आधीच उकळत्या राक्तात,
न वितळलेल्या ब-याच आठवणी थेट,
सूर्यात वितळल्या...
रात्र,
समुद्रआणि मी, दोघेही,
एकेक सूर्य गिळुन,
बरच, काही वितळवून,
रात्रीच्या काळ्या घुमटाखाली,
तारे मोजत पडलोय,
बाकी सारं शांत-शांत...अर्थातच,
सूर्योदयापूर्वी.
वाचन
1606
प्रतिक्रिया
0