मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोरियन ग्रे

सुवर्णमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
डोरियन ग्रे "बिग बॉस मधून एकाचे पलायन" कॅमेराच्या झगझगाटात प्रश्नांची सरबत्त्ती.. सेलेब्रिटी उभी आपल्याच धुंदीत तिथेच आशाळभूतपणे उभी असणारी झिपर्‍या केसाची, पोट खपाटीला गेलेली मुले .. कुणालाच दिसली नाहीत? नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा आणि बघण्याचा हट्ट वाढतोच आहे... एक कॅमेराचा झोत गेला की मागे उरलेल्या अंधारात अनेक जण सामावतात.... अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात निवडक काहींना कधी कळणार? कधी कळणार आम्हालाही? की .. प्रकाशझोतातल्या प्रत्येक 'डोरियन ग्रे' मागच्या अंधारात... कुढत, सडत असतात असंख्य निष्पाप जणु त्याच्या प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त घेत असल्यागत! अगदी जन्मभर... - सोनाली जोशी (शेवटच्या काही ओळीतील बदलांकरता विसुनानांचे आभार.)

वाचन 3496 प्रतिक्रिया 0