मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फायर एक करणे २

अत्रन्गि पाउस · · काथ्याकूट
फायर एक करणे १ मागील धाग्यातील प्रतिसादांवरून निघालेल्या काही मुद्द्यांचा उहापोह .
  • कितीही काळजी घेतली तरी मुलाखत पार पाडून नोकरी मिळवणे आणि प्रत्यक्ष मैदान गाजवणे ह्यात फरक पडू शकतो त्यामुळे मास रिक्रूटमेंट मध्ये असे 'पाशिंजर लोकस' घुसतात.
  • एच आर लोकांना मागे जाऊन अमुक पाशिंजर का / कसा आला हे माहित करून घेणे फारच जिकीरीचे असते आणि कुणी फार फंदात पडत नाही
  • नोकरी वरून डच्चू दिल्यावर लेबर कोर्टात जाऊन तक्रार केली तर भलतीच शुक्लकाष्ठ लागतात मागे ...त्यामुळे एच आर लोकस पूर्ण खात्री करून मगच फायनल कृती करतात ..पण ती करतात तेव्हा मात्र कसलीही दयामाया नसते ...
असो तर दुसरी केस ... असाच एक बर्यापैकी सिनियर रिसोर्स ..दिसायला वागायला जरासा रावडीच ... कामाला सुरुवात केलेली ...बर्यापैकी तरबेज होता...अचानक मला एच आर ची मेल ..कि बग्रौंड चेक करतांना त्या इसमाने दिलेल्या सर्तीफिकीट पैकी एक युरोप मध्ये केलेला एक डिप्लोमा त्याने केलाच नाहीये असे लक्षात आले प्रथम सामोपचार म्हणून त्याला एका आयसोलेटेड रूम मध्ये नेऊन २ जण बरोबर ... त्याला विचारले कि का रे बाबा तुझ्याबद्दल अमुक अमुक रिपोर्ट आलाय तर ...तुझी क़्वालिफ़िकेश्न्स काय त्यात त्याने त्या डिप्लोमाचा उल्लेख केला आणि पुढे त्याचे सगळे क़्वलिफ़िकेश्न्स खरोखरीच असल्याचा हेका ... बग्रौंड चेक करणारा रिपोर्ट खोटा आहे असा दावा केला .. इथे आमचे मार्ग खुंटले ... आता एच आर च्या वरिष्ठांना फोन वर घेतले आणि आम्ही साक्षीदाराच्या भूमिकेत गेलो ..एच आर वाल्याने मात्र एखाद्या कसलेल्या वकीला सारखे प्रश्नोपप्रश्न विचारून त्या कोपऱ्यात घेतले ..आणि कणाकणाने खचत गेलेला तो रावडी माणूस शेवटी हताश होऊन मान्य करता झाला कि मी खोटी प्रमाणपत्रे दिली आहेत ... पुढे घडले ते सिनेमातल्या सारखे कुणालाहि ती रूम सोडायची परवानगी नव्हती...२ सिक्युरीतीवले १ admin वाला येऊन त्याचे ओळखपत्र ताब्यात घेऊन त्याला ऑलमोस्ट हातांना धरून गेट बाहेर घेऊन गेले आणि मग ह्या प्रकरणावर पडदा पडला ... संपूर्ण कार्यवाही ४ तासात पार पडली... क्रमश:

वाचन 25825 प्रतिक्रिया 0