मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रोटीन पॅक्ड तिखट आप्पे

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः ३ वाट्या तांदूळ १ वाटी उडदाची डाळ ३/४ वाटी मूग डाळ १/२ वाटी तूरीची डाळ १/२ वाटी चणा डाळ १/४ वाटी जाड पोहे ४-५ हिरव्या मिरच्या १ छोटा कांदा कढीपत्ता कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ धुवून, एकत्र ५-६ तास भिजवणे. मिश्रण वाटण्याआधी पोहे भिजवून घेणे, मिरच्या बारीक चिरून घेणे. मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ, भिजवलेले पोहे व बारीक चिरलेल्या मिरच्या एकत्र करून वाटून घेणे. वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून चांगले एकत्र करावे. आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्यात थोडेसेच तेल घालावे व तयार मिश्रण डावाने घालून आप्पे सोनेरी रंगावर फ्राय करावे. उलटवून दुसरी बाजू ही छान होऊन द्यावी, गरज वाटल्यास थोडे तेल घालावे. . तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे. . नोटः ह्या मिश्रणाला फर्मेंट करायची गरज नाही. रात्री डाळ-तांदूळ भिजवले तर सकाळी नाश्त्याला बनवता येतात. आवडत असल्यास सांबाराबरोबरही सर्व्ह करू शकता.

वाचन 18981 प्रतिक्रिया 0