मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेपाळी बटाटा

स्वाती दिनेश · · पाककृती
माझे आजोबा आटगांवला असताना त्यांच्या कडे एक नेपाळी गुरखा खानसामा होता,तो अशी भाजी करायचा. अशी बाबा त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात. साहित्य- ४,५ बटाटे,२ टे-स्पून तेल,हळद१/२ चहाचा चमचा मिरपूड १ चहाचा चमचा,१/४ चमचा तिखट,मीठ चवीनुसार,कोथिंबीर कृती- बटाटे साले काढून लांब चिरा(फ्रेंच फ्राइज सारखे).तेल तापत टाका,त्यात हळद घाला,बटाटे घाला,मिरपूड घाला‍,तिखट घाला.परता, झाकण ठेवा,बटाटे शिजत आले की मीठ घाला.अधून मधून परता नाहीतर बटाटा खाली लागतो.कोथिंबीर घालून सजवा. पोळी/फुलक्यांबरोबर खा.
मी २ टे-स्पून लिहिले आहे पण या भाजीला तेल थोडे जास्त लागते.भाजी झाली की कढईतून दुसर्‍या वाडग्यात काढून उरलेल्या तेलात आमटी होते इतके तेल लागते,नाहीतर भाजी खाली लागते. नॉनस्टीक पॅन मध्ये कमी तेल लागेल.

वाचन 7033 प्रतिक्रिया 0