मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!! आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद? कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा. आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय. घोडा बी५ असा मोक्याच्या स्थानावर आलाय.

वाचन 19683 प्रतिक्रिया 0