मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

धोंडोपंत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कळा ज्या लागल्या जीवा... कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या ! कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ? उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा. नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं, इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी. कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे? तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे. पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ? खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा ! राजकवि भास्कर रामचंद्र तांबे लेखनकाल -३० जानेवारी १९२२, अजमेर

वाचन 14097 प्रतिक्रिया 0