मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण का लिहिता?

विवेकपटाईत · · काथ्याकूट
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न. माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे. सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले. सर्वांचे वर्णन वेगळे असले तरी प्रत्येकाच्या दृष्टीने ते सत्य होते. मला दिसलेले सत्य लोकांना पटले पाहिजे असा माझा आग्रह नाही.

वाचन 13898 प्रतिक्रिया 0