तुझ्या अंगणी
लेखनविषय:
तुझ्या अंगणी असेल बरसत
असाच पाउस अबोल, हळवा
टपटपत्या त्या थेंबांमधुनी
ऐकशील तू मंद मारवा....
तुझे ही डोळे येतील भरुनी
मेघ जणु आकाशी आतुर
सांग कसे मग लपवशील तू
मनातले ते वेडे काहूर...
कुठे लपवशील माझे हसणे
कसे रोखशील माझे गाणे
डोळ्यामधले आसू लपवण्या
कितिक करशील खुळे बहाणे...
तुला सान्गतील जुन्या वेदना
आकाशातील मेघ सावळे
पुन्हा नव्याने रूजून येतील
आठवणींचे कोंब कोवळे......
ऋतु किती हे येतील जातील
पुन्हा पुन्हा तू मला शोधशील
मनातल्या त्या मुक्या भावना
पाउस होवुन नयनी येतील.....
वाचन
2107
प्रतिक्रिया
0