मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संवेदना वगैरे

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तसं तर रोज असते तिथे ती पण आज दिसली मला डोळ्यांना अंधाराची सवय झाली असताना अनपेक्षितपणे प्रकाशाचा झोत शिरावा थेट डोळ्यात असं काहीसं झालं मला सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज आणि बहुतेक वेळेला जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत तिचं कळकटलेलं पोर खेळत असतं पण आज जरा लांब ठेवलं होतं तिने त्याला अरे हो, काल ते झाड तोडत होते नाही का.... तिने संगितलं असेल का, त्या झाड तोडणा-यांना तिला ते झाड हवय म्हणून? पण संगितलं असेल तरी तिचं कोण ऐकणार म्हणा अगदी एकविसाव्या शतकातली स्त्री झाली म्हणून काय झालं खरं तर नसेलच सांगितलं तिने कोणाला काही कारण त्या झाडापेक्षाही तिथली कचराकुंडी न हालणं जास्त महत्त्वाचं असणार तिला . . . . 'कुठे राहत असेल ही' 'कशी राहत असेल' 'काय खात असेल' 'आणि काय खावू घालत असेल तिच्या त्या पोराला' 'थंडी-पावसाचं काय करत असेल' 'गळणारं छप्पर असेल की छप्परच नसेल' एक ना अनेक मुंग्यांची रांग लागावी तसे प्रश्न घेऊन मी निघालो तिथून पण ना... एसी गाडीत बसून तिला बघताना मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय

वाचन 2773 प्रतिक्रिया 0