मंत्रालयात 'आग'-बाई
कवितेचे पहिले नाव मंत्रालयात भूलाबाई
भूलाबाईच्या माहेरी
विरोधी नणंदा, सत्तेतल्या भावजया
घरात नव्हतं मुनीमाशिवाय तिसरं कोणी
मंत्रालयातबसून लोणी, खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी....
आता माझा दादा येईलग येईलग
दादासोबत सभागृहात बसीनग/बसेनग
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
असू दे माझी चोरटी चोरटी
कायद्याचे हात आहेत लाबं
मत्रांलयातलयात फायलींना
लागलेली आग पाहून येतो थांब
भूलाबाई गेल्या काढाया सासरची रुष्टी
पाठी विसरल्या भूलाबाई माहेरच्या गोष्टी
वाचन
3788
प्रतिक्रिया
0