मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आय पील

विनायक प्रभू · · काथ्याकूट
नवरात्र सुरु झाली. जिकडे बघतो तिकडे गरबा. अगदी खांद्याला खांदा लावुन. निरनिराळी मंड्ळे कुरघोडी करण्याकरिता वेगवेगळ्या शकली काढतात. स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, आणखी काय काय . शिगेला पोचलेला आनंदोत्सव. गरब्यात भाग घेणार्यांचे चेहेरे बघितल्यावर एक्स्साइट्मेंट म्हणतात ती नेमके काय हे कळ्ते. प्रेक्षकांचा पण तुटवडा नाही. काका मंड्ळी बघोजी राव होताना " गेले ते दिवस" चे उसासे सोडतात. परत एखादी सुबक ठेंगणी हेरुन खयालोंकी दुनिया मधे फिरुन येतात. मला मात्र गरब्यात कधीही सहभागी होता आले नाही. तसे खास काही ही कारण नाही. संपर्क वाढतो अशी माहिती मिळाल्यावर गेलो होतो एकदा. पण काही जमले नाही. आणि आपल्याला जमत नाही त्या मेथड वर वेळ आणि पैसा का फुकट घालवा म्हणुन नाद सोडुन दिला. आणि अडकलो तर ची भीती. स्वकर्तुत्वावर भरोसा ठेवलेला बरा. ७० -८० ह्या दशकात मात्र नवरात्रोत्सव संपल्यावर डिसेंबर मध्ये आमच्या हॉस्पिटल मध्ये काम मरेस्तोवर वाढायचे. दिवसाला सुमारे १५० गर्भपात. (इतर वेळी सुमारे ८५ची सरासरी.) ह्यात सुमारे ६० कुमारिका. बहुधा आपण कुमारी का? हा प्रश्न त्याना त्रास देत असावा. गर्बा आणि गर्भा खेळ एकच वेळी खेळायची सोय नवरात्रेत असते..फक्त वेगवेगळ्या ठिकाणी. मग पालक यायचे डोळ्यात पाणी काढत. दुसरा कलाकार कॉलरला धरुन आणत. १.माझ्या मुलीचा पाय घसरला. २. माझ्या मुलीचे पाय वाकडा पडले. ३. चूकीची वाट धरली. ४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली. आमच्या हॉस्पिटल मध्ये एक डॉक्टरला ( कर्नाटकी) मराठी चे जुजबी ज्ञान. त्याचे वांदे व्हायचे. सांकेतिक भाषा (क्रिप्टीक) कळायचीच नाही बिचार्याला. जरा सुद्धा अतिशयोक्ती न करता मी बाजुच्या टेबलवर बसुन श्रवण केलेला, एक पालक आणि त्याचा संवाद खालील प्रमाणे. १.......= कुठे लागले. २.......= आपण एक्स रे काढु. फ्रॅक्चर आहे का ते कळेल. ३.......= नीट पत्ता घ्यावा. ४.......= पाय दुखले की बसेल ५.......= पाण्याचे त्रास आहेत का तुमच्या कडे शेवटी मी मदतीला धावलो. आणि प्रकरण संपविले. डायरेक्ट प्रेग्नंट है ऐसा क्युं नय बोलताय असे मला ऐकावे लागले ते वेगळे. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. पालक मंड्ळी एकदम मुद्द्यावार येतात. हल्ली पालकांना मधे न घालता कारभार मोकळा करता येतो की. स्मार्ट रेस आहे ना? खंडाळ्याची ट्रिप काढायची युक्ती करतात. आय पिल नंतर तर सगळे एकदम सोपे झाले आहे. चेमिस्ट कडे जायचे. एक गोळी ७२ तासाच्या आंत घ्यायची. हाय काय नाय काय. सर्व जण सुखी. पालक पण आपली मुले त्यातली नाही म्हणायला मोकळे. " आम्हाला आमच्या मुलांनी तसल्या त्रासात टाकले नाही हॉ" आमचे संस्कार पाळले."" नविन नविन शोध- नविन सुविधा.विज्ञानाचे अनेक उपयोग. एका शाळेतुन खाली उतरत असताना ९ वी मध्यी असलेल्या मुलांमधला संवाद १ला: तेरेको मालुम पडा क्या? २रा: क्या रे? १ला: रोन्सेन लोहान के साथ शादी कर रहेला है. ( ढ लोकांसाठी- ह्या दोन हॉलिवूड अभिनेत्री आहेत.) २रा: क्या बात करता है १ला: हा रे टाईम्स मे आया था.(प्लेबॉय बघायची गरज नाही. बॉम्बे टाईम्स इमरजन्सी गरज भागवतो) २रा: आय पील का खर्चा बच गया. मि. पा. सदस्य बरोबर होते. त्यांचा चेहेरा पांढरा पडला. ता.क.: कंपन्यांनी आय पील चा स्टॉक भरपुर ठेवला आहे. गुजरातेत काही ट्रक जास्त पाठ्वलेले आहेत. चेमिस्ट कडे आय पील गिर्र्हाईकायिका मध्ये ४१% स्रिया असतात. वय २० -२५ . १७% मुली वय १५ ते २०. बाकी सगळे पुरुष. इथे पण मापात पाप. विश्वामित्र कुठले. आपल्या वेळी ही शिश्टीम नव्हती ह्याचे दु:ख होत नाही - जाम भिती वाटायची गर्भपाताची. स्त्री देहाचे नंतर कॉम्प्लिकेशन ने होणारे हाल बघवत नसत.

वाचन 49121 प्रतिक्रिया 0