मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्द कथा: म्हादा

खेडूत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सक्काळच्यान दादू कावलावता. तंबाकू नाय का च्या नाय. कळकाच्या पाटया वळू वळून बोटं पाक सोलवटली व्हती. पाटलाच्या वाड्यावनं सांगावा आलावता. उद्याच्याला येरवाळी वाजान्त्री पायजेल. आता मानसं हाताशी नायती तर कोन वाजीवनार? गाडवं? मायला . . गाडाव म्हनल्यावर ध्येनात आलं. . हौसा कुटाय? मास्तरच्या घरला इटा लगीच पायजील हाईत. गाडवं मोकळी हुबी र्हाऊन जमंल व्हय ? यो म्हादा बी आयकंना झालाय.. हितं बा कामानं मरतुया आन ह्यो साळंत जातुया ! भेटला की गुर्जीला इचार्तूच आता. बाबारं, पोरगं प्वाट भरनार का शिक्शान करनार ? -------- म्हादा आला. बाला बगून हाराकलाच. दादा . . म्या सातवी पास झालो! '' झालास न्हवं ? झ्याक! आता शाळा बास. उद्यापस्नं सुदरा, गाडवं संबळा ! '' म्हादाचं त्वांड चिमनीयवडं झालं !

वाचन 4133 प्रतिक्रिया 0