मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आलेख

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अक्षर अक्षर ओघळताना झुळझुळणारे शब्द कवीता हृदयाचा आकार मनातील सुप्त सुकोमल भाव कवीता आशय गर्भित गूढ कथानक विश्लेषक तळ ठाव कवीता कळणारी न कळणारीही अंतरातली धाव कवीता कोण कुणाचा कधी न होता होता नव्हता डाव कवीता आस जनाची कणव जगाची गाभाऱ्यातील घाव कवीता मेघजळातिल गुदमरलेल्या सहवासाची हाव कवीता विलय पावलेल्या पर्वातील हळवा क्षणगुंजारव कविता सखी सोयरी जन्म तारिणी दु:ख हारिणी सरिता कविता दाहक पावक श्रावक वाहक बखर जन्म जन्मांची कविता आले गेले मुक्त जाहले मुक्त मौक्तिकांचीही कविता एकांतातील एकांताचा, द्वैताचा आलेख कवीता ……………………. अज्ञात

वाचन 1581 प्रतिक्रिया 0