"यमाची वरात"
लेखनविषय:
"यमाची वरात"
पाहिला मी तयास डोकावुनी दारात
उंब-यापाशी होती यमाची वरात
मंदावली मज बुबुळांची वळणे
भयाची कळ आली हऴव्या उरात
जरी शांतता होती चोहोबाजूंनी
रेड्याचे हंबरने झाले कर्कश सुरात
जाता कटाक्ष माझा देवघराकडे
पणतीचे फडफडणे झाले उगी जोरात
अजुनही उचलला नव्हत माझा देह
त्याची पाऊले फिरत होती घराघरात
आठवूनी आल्या मज मागच्या स्मृती
पुरता वाहून गेलो मी अश्रूंच्या पुरात
जाता शून्य नजर समोरच्या भिंतीकडे
माझाच फोटो मज दिसला हारात
येता समीप समय जाण्याचा तो
यमाचे तांडव झाले मोठ्या भारात
मंदावता आता हृदयाची धडधड
शरीर लुळे पडले एका क्षणात
गिळता कडवट आवंढा शेवटचा तो
माझाच प्राण गेला माझ्या घरात
वाचन
1837
प्रतिक्रिया
0