मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल?)

३_१४ विक्षिप्त अदिती · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सणासुदीचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे घर आवराआवरीचं खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल? आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी नारळाची वगैरे झाडं लावा, मग झावळी खाली आल्यावर हीर काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि साफसफाईची आणि नीटनेटकेपणाची हाईट" वाटते मला! तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि चिखलटिपणी! साला तो पंचा, त्याचा आंघोळीसाठी वापरून झाल्यावर, त्याचे धागे सुटायला लागल्यावर पुन्हा वापरणे भारीच. कोणाला सुचलं असेल हे असं? अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज. या कृती उत्क्रांत होत गेल्या असतील. या कृतींच्या जन्माची, उत्क्रांतीची काही कहाणी असेलच नं. जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.

वाचन 9247 प्रतिक्रिया 0