मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<ये दिल मांगे मिनिमल!>

प्यारे१ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
रामराम मिपाकरहो, साचा तयार होता. शब्द बदलले. बघा जमलंय का? --------------------------------------------------------------------- जा ना घरी सत्तापिपासू नेत्या. जा..! माझे करोडो नागरीक वाट बघतायत.. त्या खर्‍या लोकशाहीची जी वर काढेल मला हजारो समस्यांतून.. भिरकावून टाकेल आडवं येणारांना करारी निर्णयांनी झेलेल आव्हानं अल्लद अनेक हातानी... आणि मी म्हणेन तिला तूच बनून रहा सत्ताधीश आता...! मी वाट बघते त्या लोकशाहीची, जी करेल मोकळे जनतेचे घुसमटलेले श्वास आणि नेईल मला प्रगतीच्या उंच शिखरावर.. अशी लोकशाही जिच्यामध्ये पुरून उरेल अन्न, द्रौपदीच्या थाळीसारखं... कुणासाठीही...कधीही...! आणि मलाही अभिमान वाटेल तिला माझी म्हणायचा ... जा ना घरी जा. लाखो मार्गांनी माझं रक्त खेचणार्‍या नराधमा जा...! एक राष्ट्र म्हणजे निव्वळ दोन पाच हजार लोकांची मनसब नसते... एक योजना म्हणजे प्रगती नाही एका दो बूंद जिंदगी के च्या आतषबाजीत तुझी प्रगतीची कल्पना संपत असेल तर.... तर बघत बस हिरव्या देशांची नुसती स्वप्नंच.. बस बघत मुंबईच्या शांघाय करण्याच्या घोषणा देत आणि कुढत-कुरवाळत बस तुझ्या समृद्ध प्राचीन इतिहासाच्या मढ्याला ...!

वाचन 7741 प्रतिक्रिया 0