मिसळपाव कट्टा - सॅन होजे/सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरिया
सॅन होजे-सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरियामधील मिसळपाव सभासदांचा कट्टा आयोजित करण्याचा मानस आहे. सर्किटराव व एक शी बोलणे झाले असून २७ सप्टेंबर २००८ अशी प्रस्तावित तारीख आहे. वेळ - स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (प्रस्तावित)
प्रस्तुत प्रस्तावाचे/काथ्याकुटाचे उद्देश पुढीलप्रमाणे -
०. कट्ट्याची तारीख आणि वेळ सोईची नसल्यास पर्यायी तारीख आणि वेळ सुचवणे. जास्तीत जास्त सहभागींच्या सोईनुसार अंतिम तारीख आणि वेळ निश्चित करणे. सध्या उपलब्ध माहितीनुसार वरील तारीख आणि वेळ प्रस्तावित केली गेली आहे.
१. कट्टा कोठे भरवावा, याबाबत विचारविनिमय. इच्छुक सहभागींनी सूचना केल्यास उत्तम. सध्या ठिकाणाबाबत कोणतीही सूचना आलेली नाही; मात्र आधीच्या खाजगी संभाषणांमधून चर्चिले गेल्याप्रमाणे वसोना पार्क हे नाव समोर आहे. किंवा लेकवूड पार्क,सनीवेल. दुसरा प्रस्ताव आहे तो कोणाच्यातरी घरी जमण्याचा; पण कट्टेकरी/दंगेकरी,त्यांचे स्वभाव नि आवडीनिवडी यांबाबत जी आंतरजालीय ओळख झाली आहे,ती लक्षात घेता स्वतःच्या घरी कट्टा भरविण्यासाठी पुढाकार कोणी घ्यावा, याबाबत कोणाचे नक्की काही मत झालेले दिसत नाही :)
२. कट्टा होईल त्या दिवशीचा अधिकृत उपाहार काय असावा? मिसळपाव आणि आणखी काही पूरक पदार्थ, शीतपेये किंवा अन्य काही (संध्याकाळची प्रस्तावित वेळा लक्षात घेता इच्छुक सहभागींनी दुपारचे भोजन उरकून येणे अध्याहृत आहे ;) ) याबाबत चर्चा आणि वॉलन्टिअरिंग ;)
३. कट्ट्यासाठीचे कार्यक्रम - चर्चा, वादविवाद, गप्पा, गझला-कविता, नाट्यछटा, नकला, गाणी इ. उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करण्यास प्रोत्साहन असेलच, पण आधीच काही ढोबळ स्वरूप नि कार्यक्रम ठरवता आले तर उत्तम, असे वाटते.
इच्छुक सहभागींनी वरील मुद्द्यांपैकी पहिल्या मुद्द्यावर अधिक विचार केल्यास उत्तम. दुसर्या आणि तिसर्या मुद्द्यांवरील चर्चा सहभागींबरोबरच इतर मिसळपावकरांसाठी खुली आहेच. तेव्हा सर्वच सूचनांचे स्वागत आहे.
अपेक्षित सहभाग -
१. सर्किट
२. बेसनलाडू
३. एक
४. नाटक्या
५. बबलु-अमेरिकन
६. श्रीकृष्ण सामंत
७. फटू
खेरीज सहभागींचे कुटुंबिय आणि मित्रगण यांच्यासाठीही खुले आमंत्रण आहेच. दक्षिण कॅलिफोर्निया/लॉस एन्जेलिस मधून कोणाला येण्याची इच्छा असेल आणि जमणार असेल तर आगाऊ कळवावे, म्हणजे वास्तव्य आणि इतर पाहुणचाराची व्यवस्था करता येईल (पिवळा डांबिस, नंदन, भाग्यश्री, घाटावरचे भट व इतरांसाठी ही खास सूचना :) ).
त्याशिवाय सॅन होजे, सनीवेल, सॅन रॅमॉन, सॅन्टा क्लॅरा, सॅन फ्रान्सिस्को, फोस्टर सिटी, फ्रीमॉन्ट,मिल्पिटास, रेडवूड शोर्स मधील मिसळपावकरांनी संपर्क साधून सहभागी व्हायचे म्हटले तर आनंद होईल. अधिक माहितीसाठी या काथ्याकुटावरील प्रतिसादांकडे लक्ष ठेवावे आणि मला व्यक्तिगत निरोप पाठवून आपले नाव व संपर्क क्रमांक कळवावा. जेणेकरून पुढील समन्वय साधणे शक्य होईल.
धन्यवाद.
वाचन
13288
प्रतिक्रिया
0