ड्रिम जॉब !!!
पुन्यांदा रामराम लोकांनो ...
आज पुन्हा नविन टॉपिक आणलाय चर्चेसाठी ... आमच्या बागायती डोक्यात नेमीच कायबी इपरीत चालू आसतय...
तर झालं आसं ... परवा आमच्या प्रॉजेक्टची मिटींग झाली हो .. जाम राडा ... मेलामेली .. हा त्याला तो ह्याला .. नुसता ब्लेम गेम ... हत्त्च्च.. च्यायला इट आला बघा सगळ्याचा ....
आम्ही सॉफ्टवेअर वाले . १२वी झाल्यावर एका ओढ्यात वाहिल्यासारखे कंप्युटर इंजिनियरींग ला आलो. चुकुन इंजिनियर झालो .. अजुन थोडी चुक झाली आन् जॉब पण लागला. ऍडमिशन घेताना ... काय काय स्वप्न पाहिलेली सगळ्याचा पार चुराडा .. मस्त एसी रुम असेल . आपला एक क्युबिकल असेल,लठ्ठ पगार असेल.. परदेशवारी ... विमान .. फाइव्ह स्टार हॉटेलात फु़क्कट रहायला आणि चापायला मिळेल .... आजुबाजुला पोरी पण असतील .. मस्त मजा ... नो टेंशन नो वरीज ... पण मायला .. वरच्या पैकी ९०% गोष्टी ट्रू झाल्या ... पण उरलेले १०% ज्याला मानसिक ताण म्हणू.... कधी कधी फार फार विट योतो या जॉबचा .. इतका की वाटतं आता सगळं सोडून जावं हिमालयात पळून. ते तर साला ९९% च्या बरोबर आहे. म्हणून सम टाइम्स आय फील लाइक... धिस वॉज नेव्हर व्हाट आय वाँटेड टू बी !!! ईट्स जस्ट कॉज ऑफ मनी सेक अँड अ टिपीकल ऑर्थोडॉक्स करीयर पाथ.
माझा प्रश्न आहे, तुमचा स्वप्नातला जॉब कोणता? तुम्हाला मनापासून आवडेल असं कोणतं काम करावसं वाटतं ?
कारण मला माहीत आहे आज कमीत कमी ९०% पेक्षा जास्त लोकं इच्छा नसताना केवळ पैसे मिळवणे महत्वाचे म्हणून आपल्याला आवडणारं काम करत नाहीत. कारणे बरीच असू शकतील .. जसे की माझी लायकी नाही, मला ते वाटतं पण मला जमणार नाही...मला योग्यवेळी योग्य डायरेक्शन मिळाली नाही.... त्या क्षेत्रातील संधींची माहिती नाही .. किंवा आनिक काही...
काहींना स्पोर्ट्स मधे जायचं असतं . ... काहींना क्रिकेट मधे करियर करायचं असतं .. काहींना स्टोरी वाल्या चित्रपटांत काम करायचं असतं .. तर काहींना बिना स्टोरीच्या (होय .. काही दिवसांपुर्वी याच सब्जेक्ट वर चेन मेल सुरू केलेली.. त्यात असेही सत्य समोर आले आहे ... असते एकेकाची आवड .. आपण काय करणार :) ..काहींना पत्रकार व्हायचं असतं ... पण या गोष्टी साध्य न होण्याची कारणे मी नमूद केलीच आहेत.
मला खरंतर चित्रकार व्हायचं होतं .... पण एक व्यवहारिक विचार आला की .. साला चित्रकार झालो तर .. तिच चित्रे रद्दी डेपोत विकून उदरनिर्वाह करावा लागेल. कधी डिस्कव्हरी वर "लोनली प्लानेट" नावाची भटकंती मालिका पाहून त्या "इयान"चा हेवा वाटला.. च्यायला म्हंटलं .. जगभर फुकट फिरने ५-७ तारांकित मधे राहाणे ,प्रत्येक ठिकाणचं खाऊ खाणे... बक्कळ पैका .. आणिक वर मस्त जगभर लोक आपल्याला पाहाणार ... वावावा ... मला ही असंच करायचंय .. मी हा जॉब एंजॉय करेल ... पण लायकी नाही ... कसा जाणार या क्षेत्रात ? कधी वाटलेलं शरीरसौष्ठव क्षेत्रात जाऊ. पण पुन्हा व्यवहारिक विचार डोक्यात आले .... आणि इकडेच पडलो...
आपणही लिहा आपले ड्रिमजॉब ... इथे लिहायला कुठलीही अट नाही.... आपली लायकी, पात्रता, व्यवहारिक विचार ... किंवा वेळ निघुन गेली ई.ई सगळं विसरा... आपल्या स्वप्नातला जॉब आहे यार .... लिवा पटापट ...
आशा करतो तुम्ही हाही धागा एंजॉय कराल...
वाचन
15098
प्रतिक्रिया
0