भ्रमणगाथा-२ ब्रुसेल्सवर स्वारी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
2 Sep 2008 - 1:07 am

याआधी: भ्रमणगाथा-१

रात्रीचा एक वाजून गेला तरी गप्पा संपल्या नव्हत्या शेवटी एकमेकांना दटावत सारे झोपायला गेले.सकाळी ६ वाजता बस निघणार होती त्यामुळे झोपलो न झोपलो तोच उठायची वेळ झाली.सगळेच जण पटापट आवरून विपिनने केलेली मस्त चहाकॉफी पिऊन ताजेतवाने झाले.बसस्थानकाशी पोहोचलो.आतमधले सारे जण शांत बसले होते.त्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर आम्ही पोहोचल्या पोहोचल्या चहेलपहेल सुरू झाली.बस हसूबोलू लागली. एसनला आम्हाला बस बदलायची होती आणि तिथेच इरफान,विपिनचा अजून एक मित्र वाट पाहत होता.तो ही उत्तम मराठी बोलणारा असल्याने भाषेची भेळ करायची गरज नव्हती. इथे मात्र आम्हाला सीट नं दिले. इरफानला एकट्याला वरच्या मजल्यावर जावे लागले तर आमच्या ४ सीट समोरासमोर आणि २ शेजारच्या बाकावर आल्या होत्या.त्यासमोर एक जर्मन आजी आजोबा होते.बस सुरू होण्याचा अवकाश, आमची तोंडं खाणे आणि बोलणे ह्या दोन्हीसाठी अव्याहत सुरू झाली.विषय अर्थातच 'मिसळपावचे व्यसन' होता. लिखाळची मिसळमयता सांगताना सायली म्हणाली, त्याला काही निरोप द्यायचा असेल तर खरड तरी टाकावी लागते किवा व्य नि तरी करावा लागतो ; तरच त्याला समजते नाहीतर तो लक्षच देत नाही.." हास्याचे मजलेच्या मजले त्या दुमजली बसवर चढू लागले.
आमच्या समोरच्या आजीआजोबांना आमच्या दंग्याचा त्रास होईल असे वाटल्याने हळूच त्यांच्याकडे पाहिले. तर त्यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे नसून आमच्याबद्दलचे कौतुकच दिसले.आणि ते नुसतं आम्हालाच दिसलं नाही तर थोड्या वेळाने आजीने बोलून दाखवले.तुम्ही सगळे ट्रीप अगदी एन्जॉय करता आहात. खूप मजा करता आहात तुम्ही, तुमची भाषा समजत असती तर आम्हाला आणखी मजा आली असती.आजीचे असे लायसन्स मिळाल्यावर तर आमच्या दंग्याला उत आला.तासदोन तासाने मात्र सारेच पेंगुळले आणि चहाब्रेकसाठी गाडी थांबेपर्यंत छानशी डुलकी झाली.
आता आजूबाजूला पाहिले तर फ्लेमिश,फ्रेंच आणि क्वचित डच पाट्या दिसू लागल्या. जर्मनीतून बेल्जिअममध्ये प्रवेशलो हेच त्या पाट्या आम्हाला सांगत होत्या.आता मात्र आम्हाला ड्रायव्हरबाबा गाडी फारच हळू चालवतो आहे असे वाटायला लागले.कधी एकदा ब्रुसेल्सला पोहोचतो असे वाटायला लागले आणि ते तर अजून बरेच लांब होते.मग मात्र सायलीने पत्ते बाहेर काढले.मूलाहूनही मूल होऊन सारे 'उनो ' खेळलो.दुसर्‍याची पाने पाहणे,चिटिंग, ठरवून एखाद्याला गाढव करणे .. पत्ते खेळताना आवश्यक अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या.मात्र उनोमुळे तो मधला कंटाळवाणा वेळ चांगला गेला.आमच्या समोरची आजी म्हणाली सुध्दा," तुम्ही लोकं हसता तरी नाहीतर खाता तरी.. "एकदाचे ब्रुसेल्सला पोहोचलो.

इयु आणि नाटोचे मुख्यालय असलेल्या ब्रुसेल्सला कामानिमित्त आणि फिरण्यानिमित्त जायचा योग जरी २,३ दा आला होता तरी तो प्रसिध्द फुलांचा गालिचा मात्र पाहता आला नव्हता.१९७१ मध्ये पहिल्यांदा ब्रुसेल्समध्ये हा अतिभव्य फुलगालिचा इ स्टॅच्युमान्स ह्या आर्किटेक्टच्या कल्पनेनुसार रेखला,त्यानंतर त्याला ब्रुगं,घेंट,अँटवेर्प,कलोन,लंडन,पॅरिस,लुक्झेंबुर्ग इ. ठिकाणांहून असे गालिचे तयार करण्यासाठी आमंत्रणं आली.दुसरा असा गालिचा चितारायला ७६ साल उजाडलं आणि ८६नंतर मात्र दर २ वर्षांनी १५ ऑगस्टच्या सुमाराला ब्रुसेल्सच्या ग्रँडप्लेस मध्ये फुलांचा भव्य गालिचा तयार करू लागले.साधारण चारेक दिवस हा गालिचा असतो. फुलांची ती भव्य रांगोळी पहायला अवघा युरोप लोटतो.ह्यावेळी मात्र आमचाही गालिचायोग आला.ग्रँडप्लेसमध्ये चारही बाजूनी प्राचीन राजवाड्याच्या इमारती आहेत आणि मध्ये आयताकृती फरसबंद भव्य अंगण! एरवी त्या अंगणात चित्रकार आपली कलाकारी दाखवत आणि चित्रे विकत बसलेले असतात पण ह्या फुलरांगोळीच्या आठवड्यात त्यांनाही त्यांची पाले कोपर्‍यात हलवावी लागतात.त्या अंगणभर फुलांची ती अतिभव्य रंगीत कशिदाकारी आणि ती पहायला जमलेली गर्दीही रंगीबेरंगी ! डोळे भरून तो गालिचा कितीवेळ पाहिला,कॅमेर्‍यात बंद करून घेतला तरी समाधान होत नव्हते.

बेल्जिअमची काच,लेस आणि चॉकलेटे अगदी प्रसिध्द! नाजूक लेसची कलाकारी ,काचेच्या अनेकविध वस्तू आणि चॉकलेटांच्या राशीचे तिथे जणू प्रदर्शन मांडलेले असते. छोट्यामोठ्या गल्लीबोळातल्या दुकानांपासून चकचकीत काचेच्या भव्य दुकानांपर्यंत सगळीकडे बेल्जिअन काचेच्या वस्तू, लेसच्या पर्सेस,झगे,अंगडीटोपडी आणि चॉकलेटे,प्रालिननचे (चॉकलेटचा एक अत्युत्कृष्ट प्रकार)असंख्य प्रकार यांची नुसती रेलचेल असते.इंदौरला सराफ्यावर जशी जिलब्यांची आणि मिठाईची दुकाने,ठेले आहेत ना तशी इथे चॉकलेटांची आणि प्रालिननची दुकाने आहेत.त्यात आमच्या रोमेनचे प्रामाणिक मत आहे की स्वीस चॉकलेट जगात कितीही प्रसिध्द असोत.. बेल्जिअन चॉकलेटला तोड नाही ! आता स्वतः स्वीस असूनही तो असं बोलतो यातंच सारं काही आलं.तेव्हा मुद्दा असा की तिथून चॉकलेटं न घेता बाहेर पडणं म्हणजे केवळ अशक्य! मग काय? घुसलो एका दुकानात. त्या गर्दीत आम्ही तिथे गेलेलो इतरांना समजलेच नाही.शेवटी लिखाळ आम्हाला शोधायला गेला आणि बाकीचे आमच्यावर वैतागले पण चॉकलेटचा बॉक्स पाहिल्यावर साहजिकच राग पळून गेला.ब्रुसेल्समधला प्रसिध्द 'मानेकन पिस' अर्थात 'मुत्तुकुमार'चा पुतळा पाहून आम्ही ऑटोमियमकडे जायचे ठरवले.

लोखंडाच्या रेणूची १६५बिलियन पट मोठी प्रतिकृती येथे तयार केली आहे.त्या नऊ गोलांमध्ये आत शिरता येते आणि सर्वात वरच्या गोलावर चढून दोरीने खाली येण्याचा डोंबारीखेळही तिथे चालू होता.त्या उंचीवरून दोराने खाली येण्याचे आम्हाला आकर्षण वाटू लागले पण प्रत्यक्षात मात्र फक्त विपिननेच ते धाडस केले.

तिथेच पलिकडे 'मिनी युरोप' वसवले आहे.युरोपातील सर्व प्रसिध्द इमारती,वैशिष्ट्ये यांच्या प्रतिकृती तेथे तयार केल्या आहेत. (असेच मदुरोडॅमला 'हॉलंड इन नटशेल' उभे केले आहे.)चिमुकला प्रतियुरोपच! बकिंगहॅम पॅलेस शेजारी आयफेल टॉवर दिमाखात उभा आहे. शेजारी हॉलंडमधल्या पवनचक्क्या आणि ऍमस्टरडॅममधले कालवे आहेत. ग्रँड प्लेसमधला फुलगालिचा तिथे वर्षभर पहायला मिळतो. लंडनचे पार्लमेंट हाउस,बर्लिनमधले ब्रांडेनबुर्ग गेट,पिसाचा झुकता मनोरा,रोमचे कलोझिअम,पाण्यावर तरंगणारी व्हेनिसनगरी.. सारे सारे काही तिथे आहे. युरोपची मयसभाच आहे ती !


एव्हाना साडेपाच वाजून गेले होते.केसुंना तिथूनच पुढे लंडनला जायचे असल्याने त्यांनी आमचा तिथेच निरोप घेतला आणि आम्ही परतीच्या गाडीकडे निघालो.आमची सकाळचीच बस ऑटोमियमपाशी आम्हाला घ्यायला येणार होती. त्याप्रमाणे थांब्यावर गेलो . बस आलीच लगेच आणि आम्ही आत चढलो. सकाळचेच सगळे चेहरे आलेत की नाही हे ड्रायव्हरबाबा पाहत होता. आम्ही केसुला न घेता आलोत असे वाटून आमच्या समोरच्या आजीने "तुमच्या मित्राला कुठे सोडून आलात? त्याला घेऊन या लवकर. बस सुटेल आता.." असा हल्ला केला.तिला केसु परत न येता लंडनला गेल्याचे सांगितले तेव्हा लगेचच ड्रायव्हरला कळवा असा तिने धोशा लावला.जेव्हा तिच्या समोर आम्ही परत एकदा ड्रायव्हरला केसु येणार नसल्याचे सांगितले तेव्हा ती शांत झाली.
बस सुरू झाल्या झाल्या आजी आजोबांनी आमच्याशी गप्पाच मारायला सुरूवात केली.तुमची आजची ट्रीप कशी झाली? अशी सुरूवात करून ती , कुठून आलात? इथे काय करता? सध्या कुठे राहता? आजीचे प्रश्न आणि कुतुहल संपेचना! अशा बोलण्याबोलण्यातूनच इरफानच्या घरावरूनच ते पुढे जाणार असल्याचे समजले आणि आजीबाईंनी त्याला आपल्या गाडीने घरी सोडू असे जाहीर केले.पण आमच्या उत्तरांनी तिचे समाधान होत नव्हते. "तुम्ही सगळे इतक्या वेगवेगळ्या गावात राहता आणि म्हणता की भारतातही वेगवेगळ्या ठिकाणी राहता तर तुमची ओळख आणि दोस्ती कशी झाली?"तेव्हा तिच्या तोंडून 'मिसळपाव' असे वदवून घेतले आणि मग तिचा समज असा झाला की मिसळपाव नावाचे एक गाव भारतात आहे आणि तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे?

प्रवासलेखबातमी

प्रतिक्रिया

टारझन's picture

2 Sep 2008 - 1:50 am | टारझन

मस्त वर्णन आणि फोटू पण भारी .... युरोपात यायची ओढ लागली आहे ... (ऑवॉवॉवॉआऑआऑऑवॉ .. युरोप मै आ रेला) ... फ्रेंच संस्कृती बद्दल थोड आनिक जाणून घ्यायच आहेच .... स्वाती तैंची प्रवासपोथी जबरा :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Sep 2008 - 2:27 am | ब्रिटिश टिंग्या

फ्रेंच संस्कृती बद्दल थोड आनिक जाणून घ्यायच आहेच

जी हाँ!
हम समज गये की आप फ्रेंच संस्कृती के 'किस किस' बारेमे जानना चाहते है ;)

भडकमकर मास्तर's picture

2 Sep 2008 - 1:57 am | भडकमकर मास्तर

अहाहा, हे पण मस्त प्रवासवर्णन...
फोटोही मस्त...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Sep 2008 - 2:23 am | ब्रिटिश टिंग्या

प्रवासवर्णन आवडले!

मिनीयुरोप तर अल्टी दिसतयं.....चक्कर मारायला हवी!

- टिंग्या

रामदास's picture

2 Sep 2008 - 5:06 am | रामदास

सुरेख वर्णन.फोटो तर फारच छान.
मिसळपाव नावाचे एक गाव .
फारच छान आयडीया.हे गाव भारतात आहे ,अमेरीकेत आहे,युरोपात आहे.चायनात आणि आफ्रीकेत पण आहे.

प्रियाली's picture

2 Sep 2008 - 5:22 am | प्रियाली

युरोपचे चित्रदर्शी ओघवते वर्णन आवडले.

नंदन's picture

2 Sep 2008 - 5:45 am | नंदन

सुरेख वर्णन. फुलांच्या गालिच्याचा फोटोही अप्रतिम आहे. मुत्तुकुमार हे नावही अगदी क्रिएटिव्ह :) [बाल अगस्तीही चालावे ;)]

>>> तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे?

-- क्या बात है! सार्‍या घडीच्या प्रवाशांना सापडलेलं एक गाव!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

3 Sep 2008 - 12:53 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

रेवती's picture

2 Sep 2008 - 7:34 am | रेवती

दुसरी भ्रमणगाथा आवडली. फुलांचा गालीचा मस्तच!

रेवती

विसोबा खेचर's picture

2 Sep 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

स्वाती,

सुंदर चित्रदर्शी वर्णन, सर्व फोटू सुरेख.... फुलांचा गालिचा तर केवळ खल्लास आहे!

फोटोतले सर्व मिपाकर प्रसन्न दिसत आहेत! :)

(स्वातीचा शाळूसोबती) तात्या.

सहज's picture

2 Sep 2008 - 9:03 am | सहज

हेच म्हणतो.

युरोपच्या प्रसन्न वातावरणाचा व मिपाकरांच्या खळखळत्या उत्साहाचा मेळ हा लेखात जागोजागी जाणवतोय.

मोठ्या आकाराच्या फोटोंचे दुवे देना प्लीज.

ऋषिकेश's picture

2 Sep 2008 - 9:51 am | ऋषिकेश

स्वातीताई,
मिसळपाव नगरीच्या या ग्रामस्थाचा सलाम स्वीकार करावा :)
प्रवासवर्णन कसं असावं याचा मुर्तीमंत वस्तुपाठ. छान सुरवात, नेमके तरीही स्वतः मनसोक्त बागडणारे मन, अचूक निरिक्षण आणि म्हणूनच वाचकाला घडणारी मनसोक्त सफर, आणि अप्रतिम शेवट!
तुमच्या लिखाणाचा पंखा तर मी होतोच आता भक्त होण्याकडे वाटचाल चालू आहे .. तुमचे शिष्यत्व पत्करायलाच हवे. :)

हास्याचे मजलेच्या मजले त्या दुमजली बसवर चढू लागले

तुम्ही केलेला दंगा अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. देशोदेशीच्या आजी हा तर माझा लाडका विषय. दर प्रवासात एक तरी आजी - आजोबा प्रवास मजेशीर करतात हा माझा अनुभव आहे. मग तो प्रवास भारतात असो वा परदेशात.

लिलिपुट युरोप आणि फुलांचा गालिचाही भन्नाट.

मिसळपाव नावाचे एक गाव भारतात आहे आणि तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे?

अगदी खरं आहे!!

-(स्वातीताई मु.पो. मिसळपाव यांच्या प्रवासवर्णनांचा चाहता) ऋषिकेश (मु.पो.मिसळपाव)

अनिल हटेला's picture

2 Sep 2008 - 9:57 am | अनिल हटेला

सर्व च फोटो खल्लास !!!!
सुरेख वर्णन.

मिसळपाव नावाचे एक गाव .
फारच छान आयडीया.
हे गाव भारतात आहे ,अमेरीकेत आहे,युरोपात आहे.
चायनात आणि आफ्रीकेत पण आहे.

अगदी सहमत ........
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

यशोधरा's picture

2 Sep 2008 - 10:14 am | यशोधरा

मस्तच लिहिलं आहेस गं स्वातीताई :) तुझी लिहायची शैली अगदी सुरेख आहे! फोटोही छान आहेत. फुलांचा गालिचा सुरेखच!

सागररसिक's picture

2 Sep 2008 - 11:28 am | सागररसिक

मस्त

सुनील's picture

2 Sep 2008 - 12:17 pm | सुनील

प्रवासवर्ण रोचक आणि फोटोही छान. पण प्रत्येक फोटोसोबत एखाद्या ओळीची टीप असती तर अधिक उत्तम झाले असते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रीमंत दामोदर पंत's picture

2 Sep 2008 - 12:28 pm | श्रीमंत दामोदर पंत

मिसळपाव नावाचे एक गाव .
फारच छान आयडीया.
हे गाव भारतात आहे ,अमेरीकेत आहे,युरोपात आहे.
चायनात आणि आफ्रीकेत पण आहे.

एकदम सहमत.........

स्वाती ताई खुप सुरेख लिहिलं आहेस गं.........

सगळेच फोटो सुरेख पण फुलांचा गालीचा तर अप्रतिम... :)

तुझी लिहायची शैली तर फारच मस्त...... :)

सर्किट's picture

2 Sep 2008 - 12:53 pm | सर्किट (not verified)

मग ? मिसळपाव हे एक गावच आहे. येथे विदूषक आहेत, सरपंच आहेत, हाटेल वाले आहेत, कटलेले आहेत अन न कटलेले देखील आहेत. वारांगना, तुंग्रुस तर आहेतच, पण संत आणि इतर ज्ञानी लोकही आहेत.

प्रवासवर्णन आणि प्रकाश चित्रे आवडलीत.

-- सर्किट

केशवसुमार's picture

2 Sep 2008 - 12:57 pm | केशवसुमार

स्वातीताई,
मस्त प्रवास वर्णन..पुन्हा एकदा फिरून आल्यागत वाटले..
(भ्रमणमंडळाचा सभासद) केशवसुमार
स्वगतः लिखाळशेठ ह्या वेळेस माझा समोरून काढलेला फोटो पाठवलात म्हणून वाचलात.. :B भाग १चा फोटोंचा हिशोब परत भेटू तेव्हा करूच ;)

पद्मश्री चित्रे's picture

2 Sep 2008 - 12:58 pm | पद्मश्री चित्रे

फोटो दोन्ही सुंदर...
फुलांचा गालीचा चे अजुन फोटो बघायला मिळतील का ग?

जैनाचं कार्ट's picture

2 Sep 2008 - 6:33 pm | जैनाचं कार्ट (not verified)

प्रवासवर्ण रोचक आणि फोटोही छान. पण प्रत्येक फोटोसोबत एखाद्या ओळीची टीप असती तर अधिक उत्तम झाले असते

हेच म्हणतो आहे !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2008 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या प्रवासवर्णनातील ओघवत्या सुंदर शैलीचे कौतुक तरी किती करावं :)
सर्वच वर्णन आणि चित्र लै भारी !!!

मिसळपाव नावाचे एक गाव भारतात आहे आणि तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे?

क्या बात है !!!

-प्रा.डॉ. दिलीप बिरुटे
(मिसळगावचा)

प्रभाकर पेठकर's picture

3 Sep 2008 - 3:49 pm | प्रभाकर पेठकर

छायाचित्रे आणि प्रवासवर्णन मस्तच आहे. थोडी धावपळ झाल्यासारखी वाटली पण कदाचीत एकादिवसात सर्व पाहायचे म्हंटल्यावर धावपळ होणारच.
आजी-आजोबा आणि 'मिसळपाव' एक गांव ही गोष्ट फार आवडली.
छायाचित्रांखाली एक ओळीचे वर्णन औचित्यपूर्ण झाले असते. असो.
फुलांचा गालीचा 'अप्रतिऽऽऽम'.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2008 - 6:29 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वातीताई... फोटो छानच...

तो सूसू करणारा मुलगा प्रसिद्धच आहे. मिनी युरोप पण मस्त.

बिपिन.

प्राजु's picture

3 Sep 2008 - 8:20 pm | प्राजु

मला वाटतं की , प्रवास वर्णावर तुझं एक पुस्तक प्रकाशित करू शकशील... आणि खरंच कर गं एखादं.
तुझं प्रवास वर्णनाच्या हातोटीला तोड नाही.
फोटो सुंदर आहेतच शिवाय तुझ्या लेखनामुळे आम्हीही त्या भ्रमण मंडळात आहोत असेच वाटते आहे.
खास : फुलांचा गालिचा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

4 Sep 2008 - 9:16 am | मदनबाण

मस्त प्रवास वर्णन.. :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

स्वाती दिनेश's picture

10 Sep 2008 - 12:12 pm | स्वाती दिनेश

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद,
स्वाती
वि.सू- पुढच्या सहलीची आखणी व सहलीसाठी नावनोंदणी चालू आहे,त्वरा करा..:)

छोटा डॉन's picture

10 Sep 2008 - 1:49 pm | छोटा डॉन

वि.सू- पुढच्या सहलीची आखणी व सहलीसाठी नावनोंदणी चालू आहे,त्वरा करा..

मी पण आहे बरं का स्वातीताई,
माझी शीट रिझर्व्ह ठेवा ...

भ्रमणमंडळाचा नवा सदस्य - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

10 Sep 2008 - 1:56 pm | स्वाती दिनेश

होय होय.. भ्रमणमंडळ भटक्या,हौशी तरुणांचे स्वागत करतेच,तू काळजी करू नको.तुझी शीट रिजर्व आहे.
स्वाती