मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाणेघाट

स्पा · · भटकंती
नाणेघाट : मध्यम श्रेणीचा ट्रेक उंची : अंदाजे २७०० फूट जिल्हा: पुणे कसे पोहोचाल : १. कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याण ला येऊन तिथून कल्याण - मुरबाड - टोकावडे - वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण २ तास लागतात २. पुण्या मार्गे : पुण्याहून जुन्नर - घाटघर करत थेट नाणेघाटात येता येते . भल्या पहाटे थंडीत निघून बरोबर ७ च्या आसपास आम्ही मिपाकर (मी, शैलेंद्र ,सौरभ उप्स ) नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नामनिर्देशक बोर्डापाशी पोचलो. गाडी खालीच लावली (होय, यावेळी बायका नव्हत्या सोबत ) आणि वर निघालो. थंडीसोबतच जंगलात तुफान वारं सुटलेलं होतं. हा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. झाडांच्या आवाजाने आजूबाजूला पाणी वाहत आहे कि काय असं वाटत होत. १. नाणेघाटाचे प्रथम दर्शन a वाटेत टिपलेले काही क्षण २.z ३.भूछत्री az ४.gb मधेच रस्त्यात जे दिसेल त्याला सातवाहन कालीन म्हणण्याची हुक्की आली , दगड दिसलं कि सातवाहन कालीन, एके ठिकाणी जुनाट डाळींब असत तसं फळ दिसलं तेही सातवाहन कालीन ( वल्ली महाराज कि जय ) ! वल्ली काका मध्ये मध्ये फोन करून खुशाली विचारात होते. फारसा दम न लागता, तब्येतीत वर पोचलो . आधीपासून एक ग्रुप वर आलेला होता, ते पुण्याहून आलेले होते, त्यामुळे त्यांना आम्ही ह्या मार्गाने आल्याचे कौतुक वाटले ( का ते समजले नाही :) ) घाटात वर पोचल्यावर एक पुरातन सातवाहन काळातली खोदलेली एक गुहा दिसते ५ . n नाणेघाट हा साधारण अडीज हजार वर्षांपूर्वी खोदला गेला. त्याकाळी तो कल्याण बंदर आणि जुन्नर यांना जोडणारा महत्वाचा राजमार्ग म्हणता येईल , व्यापारी दृष्टीने या मार्गाला महत्वाचे स्थान असे, सदर मार्गावरून प्रवास करण्यासाठी 'करही ' गोळा केला जात असे . कल्याण बंदरात उतरणारा व्यापारी माल , हा घोडे बैल यांवर लादून थेट सातवाहनांची राजधानी ' पैठण ' येथे नेला जात असे . सदर गुहा हि अतिशय प्रशस्त असून , पन्नास साठ माणसं सहज यात राहू शकतात ६.lm ७. pl या लेण्यांमधील तिन्ही भिंतींवर शिलालेख कोरलेले आहेत, हा लेख २०,२५ ओळींचा दिसतो ,
या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो. या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे आहे.
संदर्भ : ट्रेक क्षितीज संस्था ८. शिलालेख A गुहेच्या आत जाऊन मस्त आराम केला , सोबत आणलेली खादाडी संपवली , बाहेर बरीच माकडं होती , त्यांच्या माकड चेष्टा टिपण्याचा मोह आवरला नाही :) सायबानू मीच त्यो ९. lk छोटा परिवार सुखी परिवार १०. qa गुहेच्या वर जी प्रचंड कातळाची भिंत दिसते , त्याला नानाचा अंगठा असे म्हणतात,वर तीन,चार पाण्याची टाकी आहेत. पाणी कायच्या काय थंड होतं घाटातून चढून वर आलो ११. A १२. z डावीकडे एक भला मोठा दगडी रांजण दिसतो, त्यात म्हणे जकात भरली जात असे, खरे खोटे माहित नाही 13 az उजव्या बाजूला एका लहानश्या गुहेत गणेशाची मूर्ती आहे . १४. gb १५. lk १६. lm आता उन्हात आल्याने ,मस्त उब जाणवत होती. थोडं अजून वर चढलो आणि आजूबाजूच्या भव्य प्रदेशाच दर्शन झालं. मागच्या बाजूला भैरवगड , हडसर अशा किल्ल्यांची रांग होती १९. A २०.lm प्रचंड ,भणाणत्या वाऱ्यात समोरचा जीवधन , वानर लिंगी लक्ष वेधून घेत होती. त्यामागेही काही किल्ले दिसत होते. २१.qa प्रचंड माणूस हातपाय पसरून बसलाय कि काय असं वाटत होतं. हि आवळ्याची लिंगी २२.lm २३.gb समोरच्या बाजूने गोरखगड , सिद्धगड , माहुली सुद्धा दिसतात थोड्याच वेळात खाली उतरायला लागलो . एके ठिकाणी पांगारा (? )फुललेला होता, तिथेही थोडा क्लिकक्लीकाट केला २४. qa २५. lm २६.z २७. lk साधारण तीन च्या सुमारास खाली आलो सुद्धा , एका दिवसात मुंबई - पुणेकरांना करण्याजोगा सहज ट्रेक आहे . दोन दिवस असतील तर जीवधन - नाणेघाट करता येतो . जेवणाची सोय होणं कठीणच आहे, सोबत जेवण नेल्यास उत्तम, जंगलात लाकूड फाटा बराच असल्याने गुहेतही मस्त जेवणाचा बेत करता येऊ शकतो .

वाचन 21594 प्रतिक्रिया 0