"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी"
लेखनविषय:
"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता )
ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून |
परिक्षा येता जवळी वेळ जाईल निघुन ||
करायचे आहे आईवडिलांचे स्वप्न साकार |
तुझ्या शिवाय त्यांना नाही कोणाचा आधार |
अभ्यास करि चांगला लाउनी मन |
परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन ||
आईवडीलांनी तुझ्यासाठी कष्ट केले अपार |
प्रसंगी फक्त तुझ्याचसाठी सोसली उपासमार |
शिक्षणाकडे लक्ष दे देऊनी ध्यान |
परीक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन ||
ठेच लागता तुझ, जीव त्यांचा तळमळे |
आता तरी सोडुन दे तुझे ऊनाड चाळे |
तुला करायला हवे अभ्यासात एकाग्र मन |
परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन ||
जिवनात असंख्य परिक्षा द्याव्या लागतात |
वेळ निघुन गेल्यावरी काही नाही हातात |
आई वडिल गुरू आज्ञेचे करावे पालन |
जिवनात थोर होशिल परिक्षाच देऊन ||
वाचन
3683
प्रतिक्रिया
0