मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन आहे तरी जाणकारंनी योग्य तो पाहुणचार करावा अशी नम्र विनंती मिथक : चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" चिऊ आणि काऊ : काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्रेमाने करत असे मिथक : आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला. चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत. (अवलोकन : अजून कथा संपलेली नाही तरी सर्वांनी बसून घ्यावे) मिथक : अ‍ॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते. चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत. मिथक : आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग? चिऊ आणि काऊ : पण एक दिवस आला काउने ठरवल बस झाली बेगमी आज काहीही होवो आज चिऊ वरिल प्रेम व्यक्त करायचच (अवलोकन : काऊ हा जरी वरून दिसायला कावळा असला तरी तो अती चतुर असून त्याला अजयच्या आधी `काय सार्थ आणि काय व्यर्थ' ते समजलंय. त्यानं माची वगैरे प्रकार गतजन्मीच केलेत आणि मृत्यू इत्यादि किरकोळ प्रकार त्याला रोजचेच आहेत त्यामुळे चिऊ आणि काऊ लवकर आटोपली आहे इतकंच.) मिथक : स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते. चिऊ आणि काऊ : काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही" (अवलोकन : चिऊ देखील स्नेहापेक्षा जास्त समंजस आहे तिला डायरेक्ट काऊचे वेड आहे, ऊगीच कशाला वेळ घालवायचा?) मिथक : "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल" चिऊ आणि काऊ : तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"काउ मनात म्हटला आज चिऊला दुखवायच नाही ती म्हणेल तसच करुयात आणि मग आपल्या मनातिल प्रेम व्यक्त करुयात. (अवलोकन : अजय आणि स्नेहापेक्षा काऊ आणि चिऊला आयुष्यात नेमकं काय करायला हवं ते लवकर कळलंय) मिथक : अजयने मागे पाहिले. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. पण मग त्याने विचार केला, या मिथकाचा शेवट बघून जाणेच कदाचित योग्य ठरेल. "आय नीड क्लोजर", असे पुटपुटत तिथेच एका दगडावर तो वाट बघत बसून राहिला. चिऊ आणि काऊ : जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग" (अवलोकन : "आय नीड क्लोजर" च्या दोन वेगवेगळ्या छटा) मिथक : अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!" चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत. (अवलोकन : जे मिळवायला अजयला नसते सायास करायला लागले तेच आत्मिक समाधान चिऊनं केवळ काऊच्या कुशित झोपून मिळवलंय. समाधान कुणी मिळवलं अजयनं की चिऊनं हे गौण आहे, कसं मिळवलं ते लक्षात घेण्यासारखं आहे) मिथक : अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते. चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत. (अवलोकन : स्वत:च्या अत्मोन्नतीत काहीच विषेश नाही ती काय कुणी ही करेल, पत्नीला समाधीप्रत नेऊन काऊनं अजयवर मात केली आहे म्हणून वरील ओळी पुन्हा टाकण्यात आल्या आहेत)

वाचन 17948 प्रतिक्रिया 0