मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिवाळ्यात व्हेगस

कोलबेर · · काथ्याकूट
मंडळी ह्या नाताळच्या सुट्टीमध्ये आम्ही लास व्हेगस आणि ग्रँड कॅन्यन असा दौरा करायचे ठरवले आहे. ह्यावरील मिसळपाव सदस्या 'प्रियाली' ह्यांच्या उपक्रमावरील लेखातुन बरीच माहिती मिळाली (किंबहुना तेव्हापासुनच व्हेगसचा किडा वळवळू लागला होता!) ती माहिती आणि जालावरचा शोध ह्यांची मदत घेउन फ्लाईट आणि स्ट्रीप वरील हॉटेलचे बुकींग केले. पण ग्रँड कॅन्यन येथील नॅशनल पार्क मधील विश्रामगृह बुक करताना व्हेगसहून ग्रॅंड कॅन्यनला जाणारे रस्ते हिवाळ्यात बर्फ पडल्यास कधी कधी बंद असतात अशी माहिती मिळाली. आमचा वेगसहून कॅन्यनला स्वतः ड्राइव्ह करून जाण्याचा विचार असल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली. नॉर्थ रीम ही हिवाळ्यात बरेचदा बंद असते परंतु साऊथ रीम आणि 'झायॉन नॅशनल पार्क' इथपर्यंत पोहोचण्यास डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कितपत अडचण येऊ शकते? तसेच ह्यावर्षीचे त्या भागातील बर्फ पडण्याचे अनुमान जालावर कुठे मिळेल? धन्यवाद -कोलबेर

वाचन 7552 प्रतिक्रिया 0