मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुणाचा दोष सांगा ?

चौकटराजा · · काथ्याकूट
मिपाकर मित्रहो, आपल्याला आपले म्हणणे विचारण्या अगोदर एक अगदी छोटीशी गोष्ट . एक व्यावसायिक फोटोग्राफर असतो. त्याच्याच देशातून असाच फिरताना त्याला एका समुद्रकिनार्‍यावर एक पुतळा दिसतो. त्या पुतळ्यावर वार्‍याने वाहून आणलेला पाचोळा स्थिरावलेला असतो. त्या पुतळ्याच्या मस्तकावर एक कावळा विष्ठाकर्म करीत असताना तो फोटोग्राफर " अरेरे काय या पुतळयाची अवस्था ! " या विचाराने फोटो काढतो. व ही बाब इतरांच्या नजरेला यावी म्हणून तो सदर फोटो एका ठिकाणी प्रसिद्ध करतो. होते काय की , तो पुतळा कोणा महान नटाचा, महान खेळाडूचा नसतो तर त्या देशाच्या राष्ट्रपुरूषाचा असतो. तो राष्ट्रपुरूष ज्या समाजात जन्मलेला असतो त्या समाजातील काही माणसे तक्रार गुदरतात की" आमच्यामहान विभूतीची विटंबना करणारे छायाचित्र चित्रकाराने प्रसिद्ध केले आहे. सबब त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे" चित्रकाराचे म्हणणे" मी फक्त फोटो काढला व प्रसारित केला आहे. पाचोळा वार्‍याने आणून सोडला आहे कावळा काही मजकडे नोकरीला नाही की त्याच्या कृत्याची अप्रत्त्यक्ष जबाबदारी मी घ्यावी मग सदर राष्ट्रपुरूषाची विटंबना मी कशी काय् केली ? " वार्‍याला विचारले तुझी बाजू काय ? तो म्हणाला "मी निसर्गनियमानी बांधला गेलो आहे बाकी नो कॉमेंटस ! " कावळ्याला विचारले तर तो उत्तरला "मी पुतळयावर विष्ठाकर्म केले आहे हे अमानुष कृत्य आहे म्हणता ? अहो मी अमानूषच आहे ? मी एक पक्षी आहे हो ! " तुम्ही सांगा यात दोष फोटोग्राफरचा , वार्‍याचा की कावळयाचा ? की कशाचाच नीट विचार न करता राष्ट्रपुरूषाची विटंबना फोटोग्राफर ने केली अशी अवास्तव फिर्याद दाखल करणार्‍याचा ?

वाचन 6939 प्रतिक्रिया 0