मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(काळाची गरज)

केशवटुकार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रात:स्मरणीत विडंबन भास्कर केशवसुमारांना स्मरुन ही आजची टुकारी सादर आहे. आजच्या टुकारीची प्रेरणा हष॑द आनंदी साहेबांची काळाची गरज एक प्रतिसाद पाहिजे, कौतुकात चिंब भिजणारा; टिकाकारालाही त्याच्यासोबत, थिजायला लावणारा. एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा; बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा. एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा; गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा. एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा; रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा. एक समीक्षक पाहिजे, पहिल्या वर्गात बसणारा; वृत्त् अन मीटर मोजुन, मार्कशिटे लिहणारा. एक विडंबक पाहिजे, भावना जाणणारा; कविता जशी आहे तशीच, व्यवस्थित फाडणारा . (शेवटी ) एक खरड्या पाहीजे, खरडीला खरड देणारा ; काम करण्याची अतिव इच्छा, तन्मयतेने मारणारा.

वाचन 5853 प्रतिक्रिया 0