"नेकी कर और दर्या में डाल"
माझ्या आईने माझ्यावर अजून एक चांगला संस्कार केला.
"नेकी कर और दर्या में डाल."
कं.त काम करत असतांना पण , मी माझ्या हाताखालच्या माणसांना, मनापासून शिकवायचो.त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो.कधी-कधी परीक्षा पण घेत होतो.कामावर असतांना, वाद-विवाद करायचो आणि त्याचा अंत सूसंवादाकडे कसा होइल ह्याकडे लक्ष द्यायचो.हाताखालून हजारो माणसे गेली तशीच पाठीवर शाबासकीची थाप ठोकून पण शेकडो गेली.
सध्यी मी नौकरी बदलायच्या विचारात आहे.जे शिकायचे होते , ते शिकून झाले. आता थोडा चेंज हवा आहे.मागच्या आठवठ्यांत एक मेल आली.ज्याने मेल पाठवली तो सेक्शन हेड आहे.मी उत्तर पाठवले.३/४ दिवस मेलो-मेली झाली. (पत्रो-पत्री झाली असे समजले , तरी चालेल).त्याने माझा CV फॉरवर्ड केला. त्याला एक थँक्स गिव्हिंग मेल पाठवला.
आज , त्याचा मेल आला.
"Dear Phatak bhai,
First of all don’t call me Sir, we have worked together in ATIC when I was in contract and have learnt lots of things from you and because of that only I am here on this position."
ह्या माणसाला, मी ओळखत नाही.मला ह्याचा चेहराही आठवत नाही.मी ATIC (वलसाड, गुजरात), मध्ये असतांना, हा बहुदा माझ्या हाताखाली , काम करत असावा.१९९८ला मी ATIC सोडली.आज १४ वर्षे झाली.त्यानंतर आमचा कधीही संबंध आला नाही.मी तर त्याला पार विसरून गेलो आहे.पण तो नाही विसरला.हा त्याचा मोठेपणा आहे आणि मी त्याला विसरून गेलो , हा माझ्या मनाचा कद्रूपणा आहे.
आज मला ही गोष्ट, तूमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली, म्हणून लिहीत आहे.आता मला नौकरी नाही मिळाली, तरी चालेल. पण एक गोष्ट तर सिद्ध झाली.
पेरावे तसे उगवते....त्यामूळे ह्यापूढे जे काही पेरीन, ते चांगलेच पेरीन.
आणि जर मला नौकरी मिळाली तर, त्याच्या मागे माझ्या आईने केले संस्कार आहेत.आजचा दिवस माझ्या साठी मात्रु-दिन आहे.तिने केलेल्या ह्या संस्काराचे फळ , मला ४५ वर्षांनी मिळाले.अजून काय लिहू? आज देवाला सांगीन, की जगातील प्रत्येक मुलाला, माझ्या आई सारखीच आई दे, की जिने तिचा प्रत्येक क्षण, आमच्यासाठीच वेचला.
"नेकी कर और दर्या में डाल."
वाचन
6233
प्रतिक्रिया
0