मायक्रोव्हेवमधील कैरीचा छुंदा
साहित्य:
१ कप कैरीचा कीस
दीड कप साखर (कैरीच्या आबंटपणानुसार कमी-जास्त ठरवावे)
१ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून भरडसर जीरेपूड
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१ टेस्पून पाणी
पाकृ:
एका मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये कैरीचा कीस, मीठ व हळद एकत्र करुन १० मिनिटे बाजूला ठेवावे.
आता त्यात साखर व १ टेस्पून पाणी घालून सगळं एकत्र करावे व ५ मिनिटे बाजूला ठेवावे.
मायक्रोव्हेव मध्ये बाऊल ठेवून हाय पॉवर वर ३ मिनिटे शिजवावे.
बाऊल बाहेर काढून मिश्रण गार होऊ द्यावे.
मिश्रण थोडे चिकट व एकतारी असले पाहिजे.
पूर्ण गार झाले की त्यात लाल तिखट व जीरेपूड घालावे व मिक्स करावे.
काचेच्या बर्णीत भरावे.
हा छुंदा तुम्ही चपाती, थेपले, पराठे व रोटीबरोबर खाऊ शकता.

वाचन
8268
प्रतिक्रिया
0