मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मायक्रोव्हेवमधील कैरीचा छुंदा

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्य: १ कप कैरीचा कीस दीड कप साखर (कैरीच्या आबंटपणानुसार कमी-जास्त ठरवावे) १ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून भरडसर जीरेपूड १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार १ टेस्पून पाणी Image removed. पाकृ: एका मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये कैरीचा कीस, मीठ व हळद एकत्र करुन १० मिनिटे बाजूला ठेवावे. Image removed. आता त्यात साखर व १ टेस्पून पाणी घालून सगळं एकत्र करावे व ५ मिनिटे बाजूला ठेवावे. Image removed. मायक्रोव्हेव मध्ये बाऊल ठेवून हाय पॉवर वर ३ मिनिटे शिजवावे. बाऊल बाहेर काढून मिश्रण गार होऊ द्यावे. मिश्रण थोडे चिकट व एकतारी असले पाहिजे. Image removed. पूर्ण गार झाले की त्यात लाल तिखट व जीरेपूड घालावे व मिक्स करावे. Image removed. काचेच्या बर्णीत भरावे. हा छुंदा तुम्ही चपाती, थेपले, पराठे व रोटीबरोबर खाऊ शकता. Image removed.

वाचन 8268 प्रतिक्रिया 0