मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पर्यटन आणि मी.

VINODBANKHELE · · काथ्याकूट
रामराम मंडळी, मी विनोद बाणखेले , राहणार मंचर ,तालुका -आंबेगाव, जिल्हा- पुणे, सध्या सायबर कॅफे चालवतोय, कामाच्या व्यापामुळे गेले दोन महिने मी माझ्या कुटुंबियांना कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकलो नाही , मंचरच्या जवळ भरपूर ठिकाणे आहेत जसे भीमाशंकर , आहुपे , भोरगिरी, ओझर ,लेण्याद्री, शिवनेरी ,चावंड, जीवधन ,नाणेघाट,दार्याघाट, माणिकडोह, निमगिरी, हडसर,नारायणगड,माळशेज घाट , हरिश्चंद्रगड ,खोडद ,गिरवली, पिंपळगाव ,मोराची चिंचोली, पारुंढे , आणे,चास कमान एक न दोन अनेक. माझ्या परिवाराला मी सोबत नसताना अगदी काळजी काट्याने आपल्या घरातील लोक असल्या सारखे सांभाळून व्यवस्थित मार्गदर्शना सह कोणी फिरवून आणील याचा आमच्या मंचर परिसरात शोध घेतला असता फार भयंकर परिस्थिती समोर आली, वरील सर्व ठिकाणी एस टी महामंडळाच्या सेवेने जायचे म्हणजे अवघड कार्यक्रम आहे, आणि खाजगी वाहन व्यवस्थे चे चालक बरेच डोलकर पंथीय आहेत. वरून या सर्व ठिकाणी जेवण किंवा वेळप्रसंगी मुक्कामाची सोय करणे म्हणजे काय असते याचा अनुभव मी स्वतः घेतला असल्याने त्याची हि वेगळी काळजी आहेच. आता तुम्ही म्हणाल या सगळ्या ला आम्ही काय करू शकतो, म्हणजे का बाबा आम्हाला पिडतोय तुला काय करायचं ते कर. नाही तर एवढा त्रास होतोय तर कशाला उगाच घरच्यांना फिरायला जायचं? वगैरे वगैरे.... पण .........मला शेअर करायचं आहे ते वेगळेच , हि जी परिस्थिती आहे त्या सर्वावर मात करण्या साठी मी काही प्रयत्न करावा म्हणतोय. काही तरी असे कि माझ्या कुटुंबा बरोबरच त्याचा उपयोग माझ्या सारख्याच आपल्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्वांना झाला पाहिजे. मित्र परिवारा बरोबर चर्चा सत्र सुरु आहेतच. त्याचे अपडेट्स निष्कर्ष पुढील वाटचाल हि आपल्या समोर ठेविलच . तुमचे हि काही अभिप्राय असतील, सूचना असतील त्या जरूर द्या. फोन , इमेल ,खव , जमेल तिथे जमेल तसा संवाद व्हावा हि विनंती. माझा मोबाईल नं. ९८५०२२९८२२ इमेल vinodbankhele@gmail .com

वाचन 3112 प्रतिक्रिया 0