मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुंतवणु़कीच्या काही योजना खरच बोगस आहेत का?

निश · · काथ्याकूट
दोन तीन दिवसाआधी लोकसत्ता च्या पहिल्या पानावर एक बातमी आली होती की भरमसाठ लाभाची गुंतवणुकीवर हमी देणार्‍या योजनांची बाजारात भरमार झाली आहे व त्यातल्या बहुतेक सगळ्या बोगस आहेत म्हणुन. त्यात ट्वींकल म्हणुन ही गुंतवणुक योजनेच बोगस म्हणुन नाव आल होत. अश्या अजुनही काही योजना असतिल ज्या लोकाना भरपुर लाभाची हमी देउन लोकांना फसवीत असतील. मुळात ह्या अश्या योजनांवर R B I स्वताहुन कारवाई का करत नाही ? लोकांचे पैसे डुबायची का वाट बघत? R B I ची अश्या योजनाबद्दल नक्कि नियमावली काय आहे? अजुन कोण अजुन लोक असतील जे अश्या गुंतवणुक योजनांमध्ये पैसे गमावलेले आहेत ते त्या कुठल्या योजना आहेत त्याबद्दल सांगतिल का? जेणे करुन भविष्यात अश्या योजनांमध्ये लोक गुंतवणुक करुन आपले पैसे गमावणार नाहीत.

वाचन 3973 प्रतिक्रिया 0