तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे.
ह्याला कारणही तसच घडल. परवा रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द फडात तमाशा पहायला गेलो होतो.
बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते तिकिटं काढायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या 'साखरभाताला' विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला जत्रेच्या सुपारीची आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरंच नवल वाटल की जर जत्रेत फड भरवून ह्या मातीची संस्कृती जपली जात असेल तर मग आपली संस्कृती फक्त तमाशांवर चालायला हवी. नाचव बाई जप संस्कृती. काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग तमाशा देखील आपली संस्कृती आहे अस का म्हटल जातं? म्हणुन खरंच तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
वाचन
24570
प्रतिक्रिया
0