मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बडवा (७)

राजघराणं · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भाग १ - http://www.misalpav.com/node/20503 भाग २ - http://www.misalpav.com/node/20510 भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520 भाग ४ - http://www.misalpav.com/node/20532 भाग ५ - http://www.misalpav.com/node/20541 भाग ७ - http://www.misalpav.com/node/20603 नियतीने पायात घुंगरू बांधले. ता तै तम धित तै तम. भारतीय शास्त्रीय न्रुत्यप्रकार पाच. प्रत्येक पंचतत्वाच्या नावाने एकेक. त्यातले भरतनाट्यम म्हणजे अग्निनृत्य. ता तै तम धित तै तम. सूत्रल अदवू चा पदन्यास सुरू झाला.त्यात चार हस्तमुद्रा वापरतात. पाची बोटे एकत्र असलेली पताका, दुसरी अलपद्म् , तिसरी अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी बनवलेले हरणाचे तोंड - कटकमुख आणी चौथी मुद्रा शिखरमुद्रा . ता तै तम धित तै तम. नियतीने नमस्कारम करून दोन्ही हाताच्या पताका उंचावल्या. दोन्ही पताका डोक्यावर इकडून तिकडे फिरू लागल्या. झेंडे.. झेंडे ...झेंडे... झेंडे. ता तै तम धित तै तम. मग नियतीच्या उजव्या हाताच्या पताकेचे उमललेल्या कमळात - अलपद्मात रूपांतर झाले. चारी बोटे बाहेर ताणलेली अन करंगळी मनगटाजवळ आलेली. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ? ता तै तम धित तै तम॥ नियतीच्या दोन्ही हातांची कमळे डोक्यावर उधळली गेली. पावसाच्या सरींप्रमाणे कमळे अंगावर कोसळू लागली. त्या लाडीक सुखाने, सुवासाने नियतीचा चेहरा सुखाचे प्रसन्न भाव दाखवत होता. ता तै तम धित तै तम. पितृप्रेमाचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा, फुलेच फुले होती माझ्या आयुष्यात. पण मधेच उपटले हे - दोन्ही हाताच्या पताका आभाळात फेकत नियतीने दाखवले - झेंडे.. . अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ? ता तै तम धित तै तम॥ मूठ बंद अंगठा सरळ ताठ वर - दोन्ही हाताच्या शिखरमुद्रा नियतीने समोरासमोर धरल्या. कल्प्नेतला राजमुकुट शिखरमुद्रांनी डोक्यावर चढवला. विचारले -राजकारणाचे झेंडे ? पताका परत आभाळात फेकत विचारले - जातीचे झेंडे ? धर्माचे झेंडे ? अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे राजकारण ? कोणाचा धर्म ? कोणाच्या जाती ? ता तै तम धित तै तम ॥ पित्याचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा अंगावर पडायचा थांबला. कारण मधेच उपटले हे - झेंडे.. शिखरमुद्रा नियतीने उलटी धरली. अंगठ्याने कपाळावर उभे गंध रेखाटले. आणी दाखवला - पुरुष..... पुरुषांची आडनावे. पुरुषांची वंशशुद्धी, पुरुषांच्या जाती, पुरुषांचे धर्म, पुरुषांचे राजकारण. झेंडे.. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ? ता तै तम धित तै तम॥ अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी नियतीने हरणाचे तोंड तयार केले. करांगुली आणी अनामिकेचे दोन कान झाले. कटकमुद्रा अवकाशातले कण तोंडाने वेचू लागली. नीयतीच्या आयुश्यातले क्षण होते ते. पित्याने डोक्यावर उचलून ज्योतिबाला नेले तो क्षण, मातृहीन मुलीला घास भरवले ते क्षण, मुक्या मुलीला व्यक्त होता यावे म्हणून भरतनाट्यम शिकवले ते क्षण. प्रियकराने कंबरेवर हात ठेवला तेंव्हा उठलेला थरार, त्याची अमोघ भाषणे ऐकताना अंगावर उठलेला रोमांच, त्याच्या ओठांच्या स्पर्षातली जादू. कटकमुद्रा सारे क्षण सार्‍या भावना टिपत होती. ते सारे आता पुन्हा का मिळणार नाही ? अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ? ता तै तम धित तै तम॥ शिखरमुद्रांनी उचलून नियतीने राजमुकुट फेकून दिला. प्रियकर काय निवडेल ? राजमुकुट की मोगरा ? पिता काय निवडेल झेंडा की जास्वंद ? ता तै तम धित तै तम. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. नियतीने फेर धरला. नाहीतरी पुरुषांच्या या महान भारतीय नाट्यात मुकी नियती काय करू शकणार होती? नियतीचे अग्नीनृत्य पेटत चालले, फेर्यांचा वेग वाढत राहिला. ता तै तम धित तै तम, ता तै तम धित तै तम ॥ ***************************************************************************************************** शिंदे सर जरासे उखडले होते. राजवीर सोबतची बैठक विषेश जमली न्हवती पण अजून आशेला वाव होता. नियती सुंदर असली तरी मुकी होती. तिला चांगल्या घरी उजवायला थोडेबहुत कष्ट पडणारच. आज बरेच विषय मार्गी लागायला हवे होते. पत्रकाची केस, टीपू सुल्तान नगरची कारवाई, हे घरगुती विषय, विनोदचा राजकारण प्रवेश. सगळ्या विषयांवर विनोद्शी सविस्तर बोलणे आवश्यक होते. पेग पहीला (क्रमशः)

वाचन 3405 प्रतिक्रिया 0