मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिलेबी ....

पियुशा · · पाककृती
जिलेबी..... चला मि.पा. करानो , आज शिकुया जिलेबी बनवायला साहित्य : मैदा - २ वाट्या तांदळाची पिठी - २ चमचे खाण्याचा केशरी कलर (चुटकी भर ) दही - ४ चमचे तूप साजूक असेल तर उत्तम सॉसची बाटली नाहीतर दुधाची रिकामी पिशवी मी दही घातले मैदा आंबवन्याकरिता तुम्ही जर यीस्ट वापरणार असाल तर अर्धा चमचा यीस्ट २ चमचे पाण्यात १० मिनट ठेवून मग मिश्रणात घाला Image removed. पाकासाठी : साखर २ वाट्या . पाणी १ वाटी. केसर चिमुटभर . दुध २ चमचे अथवा लिंबाचा रस १/२ छोटा चमचा . कृती : एका भांड्यात मैदा चाळून घ्या , त्यात दही / (यीस्ट) ,तांदळाची पिठी अन थोड पाणी घालून मिक्स करून घ्या मिश्रण जास्ती घट्ट अथवा पातळ नको हे असे हवे Image removed. आता हे मिश्रण १० -१२ तास आंबावन्या करिता घट्ट झाकून ठेवा. अन उद्या जिलब्या कशा पड्तील ;) गोल होतील की त्रिकोणी ?की आणखी कशा ? याचा विचार करत झोपी जा ;) असो.... सकाळी जिलेबिच मिश्रण दुप्पट फुगल असेल . Image removed. आता आधी पाक करून घेउया . २ वाट्या साखर अन एक वाटी पाणी असे प्रमाण घेऊन साखरेचा पाक तयार करून घ्या ( टीप : पाकात किंचित लिंबू पिळले अथवा २ चमचे दुध घातले तर पाक स्वच्छ होतो ) आता जिलेब्या तळून घेऊया तळण्याकरीता पसरट भांड असेल तर उत्तम ! तूप गरम करा आता मिश्रण सॉसच्या बाटलीत घालून गोल गोल जिलब्या पाडायचा प्रयत्न करां. हम्म ....आता आमच्यासारखे नवशिके असाल तर पहिल्या पाच - सहा जिलब्या तुम्हाला भारताच्या नकाशाची आठवण नक्किच करून देतील ! पण तुम्ही हार मानु नका ;) Image removed. आता मंद आचेवर जिलब्या तळून घ्या अन साखरेच्या पाकात दोनेक मिनिट डीप करून घ्या गरमागरम क्रिस्पी जिलेब्या खायला तयार आहेत ही पहा आमची जम्बो जिलेबी ;) Image removed. Image removed. (अजून एक : - जिलेब्या लगेच खायच्या असतील तर साजूक / साध्या तुपात तळा अन जास्ती वेळ कुरकुरीत ठेवायच्या असतील तर तेलात तळलेल्या जास्ती वेळ क्रिस्पी राहतील ) असो .....ही रेसेपी देउन आम्ही आमचे (मि.पा.वरचे ) नाव सार्थ केले आहे ;) आपली क्रुपाभिलाषी __/\__ जिल्बुशा नगरकर ;)

वाचन 23052 प्रतिक्रिया 0