मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुगाच्या डाळीचा हलवा ...

पियुशा · · पाककृती
मुगाच्या डाळीचा हलवा साहित्य : २ वाट्या मुग डाळ , २ वाट्या साखर ( पिठीसाखर ) , काजू १०-१२, बदाम १०-१२ , मनुके २०-२५ तूप अर्धी वाटी ( साजूक असेल तर उत्तम ),इलायची पावडर अर्धा छोटा चमचा , दुध अर्धी वाटी (ऑप्शनल) कृती : मुगाची डाळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात किमान दोन तास भिजत घाला , नंतर डाळ कोरडी करून मिक्सिमध्ये दरदरीत वाटून घ्या ,(अगदी पुरणासारखी केली तर हलवा गिचका लागतो ) Image removed. एका कढईत २ चमचे तूप घाला ,त्यात डाळीचे मिश्रण घाला ,कमी आचेवर हलवत राहा , गाठी होऊ देऊ नका ( याला हलवा का म्हणतात हे तुम्हाला हळूहळू कळेलच ) ;) मिश्रणाचा कलर लालसर सोनेरी होईपर्यंत हलवण्याचे काम चालू द्या , साधारण २०-२५ मिनिट तरी लागतात डाळ छान परतायला ,मग हवा तसा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत हाताचे मसल्स एकदम टाईट झालेलं असतील असो आता मिश्रण हळूहळू मोकळे होवून तूप सोडू लागले की मिश्रणात साखर घाला ,साखर वितळू लागली कि हलवा मोकळा अन सैल होऊ लागतो ,आता एका वाटीत ४ चमचे साजूक तूप गरम करा त्यात मनुके , इलायची पावडर , काजूचे ,बदामाचे काप तळून घ्या ,हलव्यावर ओता ,हलवा पुन्हा एकदा ढवळून घ्या Image removed. ,हुश्श ....... आता तुम्ही घामाघूम झाला असलाच ,आधी फ्रेश व्हा थंड थंड संध्याकाळी गरम गरम हलवा खाऊन थंडी एन्जॉय करा :) ( टीप हलवा जर जास्ती कोरडा वाटला तरच दुध घाला ,(काही लोक यात खवा / मावा घालतात ) Image removed. Image removed.

वाचन 18738 प्रतिक्रिया 0