...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत
आज ऑन लाईन म.टा. वाचताना अजून एका बातमीने लक्ष वेघले. त्या बातमीतील जावईशोध वाचून मी उडालो.
त्यात म्हणले आहे "स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही, असा विचित्र दावा सौदी अरेबियातील 'मजलिस अल-इफ्ता अल-आला' या सवोर्च्च धार्मिक संस्थेने एका अहवालात केला आहे. वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल 'वैज्ञानिक' असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. "
स्त्रियांना वाहन चालविण्यास बंदी घालणारा सौदी अरेबिया हा जगातील एकमेव देश आहे. ही बंदी उठवली, तर काय घडेल, याचा मागोवा घेणारा अहवाल मजलीसने प्रसिद्ध केला आहे
जेद्दा येथे शैमा जास्तनिया ही ३४ वर्षांची महिला वाहन चालविताना आढळल्याने तिला चाबकाचे दहा फटके मारण्याची शिक्षा नुकतीच देण्यात आली होती. त्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
त्या अहवालातील इतर तपशील जरूर वाचा.
आज महीला अवकाश यानातुन अंतरीक्षात सफर करीत आहेत त्याच बरोबर जगाच्या एका भागात अशीसुद्धा अवस्था आहे.
वाचन
6280
प्रतिक्रिया
0