साहित्यः
२ बटाटे उकडून कुस्करून घेणे
साधारण १ वाटी पालक उकडून व पाणी निथळून घेणे
१ वाटी सोया ग्रान्युल्स गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवून, हाताने दाबून पाणी काढून घेणे
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टीस्पून लसुण बारीक चिरून
१ टीस्पून आले बारीक चिरून
२ टेस्पून पंढरपुरी डाळ कोरडीच भाजून घेणे
२-३ टेस्पून ब्रेड क्रम्बस
१/२ टीस्पून चाट-मसाला
१/२ टीस्पून जीरे
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
मिक्सरच्या भांड्यात उकडलेला पालक, सोया ग्रान्युल्स, आले, लसुण, हिरव्या मिरच्या, पंढरपुरी डाळ, जीरे, चवीप्रमाणे मीठ, चाट-मसाला एकत्र करून वाटून घेणे. (चाट-मसाल्यात ही मीठ असते त्याप्रमाणे मीठ घालावे).

वाटलेले मिश्रण उकडून कुस्करलेल्या बटाट्यात घालणे, ब्रेड क्रम्बस घालून चांगले एकजीव करावे.

मिश्रणाचे गोळे करुन टिक्की बनवावी व नॉन-स्टीक पॅनमध्ये तेल तापवून शॅलो-फ्राय करावी.

तयार सोया-पालक टिक्की तुम्ही टोमॅटो सॉस, चटणी बरोबर सर्व्ह करु शकता. ही टिक्की नुसती ही खायला छान लागते. आवडत असल्यास मिश्रणात थोडा गरम-मसाला ही घालू शकता.
