मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक प्रायोगिक कविता

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली. हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते. आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय. आधीची कडवी बघा जमतात का? कुणी सांगतो म्हणून केसू नवीन कडवी वळतो आहे नवीन काथ्याकुटाखाली सूंभ पुराणा जळतो आहे. रामदास.
रामदासशेठने दिलेले हे काम कठिण होते पण आमच्या सुमार बुद्धीला जे सुचेल ते खरडले.. आता तुम्हीच बघा जमतंय का.. सूचना: रामदास आणि केसू ह्या दोन व्यक्ती सोडून खालील लिखाण संपूर्णपणे काल्पनिक आहे. उगाच संदर्भ शोधण्यात वेळ वाया गेल्यास आम्ही जबाबदार नाही. चला करूया गंमत थोडी 'रामदास' हा म्हणतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू 'नवीन कडवी वळतो आहे जमीन दिधली आहे तुजला कडवे हे घे शेवटचे खाज खाजवून डोके 'केश्या' कडवी पहिली लिहितो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे प्रेम घातले अर्था चमचा, विरह घेतला जोडीला धोका वचने स्वप्नभंगही मसाल्यात या भरतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे चंद्र चांदणे, पाऊस ओला, एकांतातील ते हळवे क्षण त्याच त्याच या जुन्या कल्पना कविते मध्ये दळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे बाप धुलाई, लाथा बुक्या, बाई बाटली आणिक लफडी सुमार काव्ये पाडून असली रसिकांना हा छळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे ढुंगण, कुल्ले, नितंब गोंडसं हा शब्दांचा खेळ बरा छचोर किरणे नास्तिक चाळे पुन्हा पुन्हा हा करतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे घरटे, राक्षस, बगळे, कमळे, पिसी जेसी झाडून सगळे प्रायोगिक कवितेला मेला शाब्दिक ठिगळे शिवतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे क्लास, पुस्त़के, भटकंती अन व्यक्तिचित्रे, चित्रकळा फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू'नवीन कडवी वळतो आहे लग्ने मुंजी, वाढदिवस अन कुठे चालली खादाडी संगीत, गाणी जुन्या मैफिली कट्टे भरवत फिरतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे अस्वल, पाली, मांजर, कुत्री जनावरांची रांग किती जो तो मेला आता येथे संपादक मी म्हणतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे इतिहासाच्या गप्पा भांडण त्याच त्याच त्या बाष्कळ चर्चा नवीन काथ्याकुटाखाली सूंभ पुराणा जळतो आहे. कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे केशवसुमार

वाचन 11468 प्रतिक्रिया 0