मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंघोळ

विनायक प्रभू · · काथ्याकूट
दिवाळीच्या पहाटे आंघोळ करताना उटणे लावले जाते. ते नेमके का लावतात? त्या मागचे शास्त्रिय कारण काय? एकतर आज काल तर नोव्हेंबर मधे थंडीचा मागमुस सुद्धा नसतो. त्यात तेल लाउन आंघोळ म्हणजे अत्याचारच होतो. आता बाथरुम मधे ए.सी.लावण्याइतकी जागिरदारी काय उतु जात नाहीये. आणि हे वर उटणे लावायचे कंपलशन. मी तर दिवाळीच्या दिवशी उटण्याच्या पाकिटाला हातच लाउ देत नाही. आंघोळ चालेल. पण उटणे फक्त शास्त्रापुरता. उटणे लावायच्या परंपरेची कारण मिमांसा होइल काय?

वाचन 8164 प्रतिक्रिया 0