मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नक्षिदार पराठे

जागु · · पाककृती
साहित्यः पालक पेस्ट १ वाटी (थोड्याश्या पाण्यात वाफवून पेस्ट करावी) अर्धा चमचा आले-लसुण पेस्ट १ किसलेला गाजर थोडी कोथिंबीर चिरुन हिंग, हळद गोडा मसाला १ चमचा मिठ साजूक तुप गव्हाचे पिठ अंदाजे ३ वाट्या Image removed. पाककृती: तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. पाणी आधीच जास्त घालू नका कारण पालकाच्या पेस्टचा आधीच ओलसरपणा असतो. मळून झाले की चमचाभर तेल टाकुन त्यातून गोळा मळा म्हणजे पिठ चिकटणार नाही (आता रोज चपात्या करणार्‍या मला म्हणतील ही काय सांगते आम्हाला ? :हाहा:) Image removed. आता गोळे करुन पराठे लाटा बघा कशी नक्षी तयार झाली (पुर्वी बांगडीच्या तुकड्यांची अशी नक्षी केलीच असेल तुम्ही) Image removed. चला आता तव्यावर टाका आणि भाजताना मस्त साजुक तुपाची धार पसरवा. कसा खमंग वास पसरतो. Image removed. सॉस, चटणी कशाही बरोबर खा. Image removed. अधिक टिपा: ह्यात अजुन मटारची पेस्ट करुन टाकु शकता, मेथी चिरुन टाकू शकता. असेच बिट वाफवून त्याची पेस्ट करुनही टाकू शकता पण ते पराठे पुर्ण लाल होतात. आले-लसूण पालकातच टाकुन पेस्ट केली तर वेळ वाचतो.

वाचन 13076 प्रतिक्रिया 0