मनुष्यप्राणी हा मुलतः शाकाहारीच
मनुष्याच्या शरिराकडे नीट लक्ष देऊन पाहिल्यावर,एक गोष्ट निश्चीत लक्षात येईल की मांसाहारी होण्यास मनुष्य परिस्थितिनुसार उद्युक्त झाला असावा.कारण मनुष्य शाकाहारीच आहे.माझ्या पुढील चर्चेतून मला वाटतं, तसे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे तुमच्या लक्षात येईल.तसंच माणसाला निसर्गाने (किंवा वाटल्यास देवाने म्हणा) अविरत बुद्धिचातुर्य दिल्याने,गरजेनुसार तो आपल्या खाण्याच्या संवयीत बदल करीत गेला असावा.
मनुष्याचे बुद्धिचातुर्य आणि त्याचा वापर हे "शाप की वरदान"ह्यावर चर्चा करायला निराळा विषय घेऊन लिहावं लागेल,पण तुर्तास एव्हडंच म्हणता येईल की ज्या ज्या वेळी माणसाने आपलं बुद्धिचातुर्य निसर्गाशी दोन हात करण्यासाठी वापरलं त्यावेळी कालांतराने त्याचे परिणाम त्याच्या अधोगतीच झाला आहे.ह्याची खूप उदाहरणं देता येतील.
मांसाहारी(मासेहारी नव्हे) होण्यास त्याने असाच निसर्गाशी आपल्या शरीराचा आणि त्याच्या क्षमतेचा विचार न करता घेतलेला निर्णय असावा असं मला वाटतं.मांस खाण्यास उद्युक्त होण्याची कारणे काही असोत तसे करण्याने पुढे होणारा अनर्थ काय असावा याचे ध्यान त्याला राहीलं नसावं नाहीपेक्षा कॅन्सर, विषेशतः कोलन कॅन्सर,आंतड्याचे रोग,ओबीसीटी,पोटाचे रोग आणि असले अन्य बरेच प्रकारचे रोग आज पाश्चिमात्य देशात उद्भभवत असल्याचे पाहून माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यावर गंभीर चर्चा जी होत आहे,त्यावरून असं दिसून येईल की आता बरेचसे so called expert सांगू लागले आहेत की "बाबानो,शाकाहार घ्या."
निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टी मधे वनसृष्टी आणि जीवसृष्टी असे दोन ठोबळ group दिसून येतील.वनसृष्टीलापण जीव असतो.तिचं बीज असतं,ते उगवतं,वाढतं,त्याला वाढताना ऊन,पाऊस,हवेची जरुरी लागते.झाड लहानाचं मोठं होतं.त्याला फळं लागतात,त्यातून परत बीजं तयार होतात, झाड वाढतं,म्हातारं होतं,सुकतं,रोगही होतात आणि मरतं पण.
अगदी असंच जीव सृष्टीचं होतं.फरक एव्हडाच की जीवसृष्टीत जीवाला(काही अपवाद सोडल्यास)आवाज काढता येतो.म्हणजेच त्या जीवाला वाचा असते.माणसाला तर बोलतापण येतं.आणि दुसरा फरक म्हणजे जीवाला (काही अपवाद सोडल्यास) चालतापण येतं.ह्याचे फायदे तोटे परी परीने आहेत.ह्यावर मी एक गमतीदार कवितापण लिहीली आहे.ती अशी.
ईश्वराचे कोडे
म्हणे "वनसृष्टी" ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल "जीवसृष्टीला"
हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो "वनसृष्टीला"
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते "जीवसृष्टीला"
एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली "मानवानें"
सदैव भांडणे
दूर जावूनी विसरला
हा "मानव" अपुली मुळे
आता मुख्य मुद्याकडे वळल्यावर असं दिसून येईल की,ह्या जीवसृष्टीतपण निसर्गाने
दोन group केले आहेत १) शाकाहारी आणि २) मांसाहारी (ह्या जीवसृष्टीतले सरपटते जीव,तसेच किटक,आणि मासे ह्याना वगळून) वरील दोन groups चा
विचार केल्यास असं दिसून येईल की,हे चारपायाचे (गाई,म्हशी,कुत्रे,कोल्हे,वाघ,सिंह,बकऱ्या,डुकरं आणि माणूस(?)) माणसापुढे प्रश्न चिन्ह एव्हड्यासाठीच केलं की,असं म्हणतात माणूस ही माकडांची "अवलाद" आहे.तो पुढ्चे दोन हात आणि मागचे दोन पाय याचा वापर करून जमीनवरच चालायचा.(माकडा सारखा), पुढे काही कारणास्तव ,झाडावर कोण चढून वरची फ्ळं काढणार? जमिनीवरूनच पुढचे दोन हात वर करून मागच्या दोन पायावर उभं राहून जी काही फळं हाताला लागतील ती काढून खावी, (आळशीपणा?) असं करता,करता कणा सरळ करून उभा राहू लागला तो मग उभाच राहू लागला. आणि उभा होऊन चालू पण लागला.गम्मतीचा भाग सोडल्यास सांगायचं म्हणजे बुद्धिचातुर्याने गरजेनुसार तो उभा राहू लागला.
तर दोन पायाच्या"माणसाचा" अपवाद सोडल्यास, दोन पायाचे सर्व जीव निसर्गाने "पक्षी " म्हणून तयार केले.पक्षांच्या मांसाला पाढरं मांस (white meat) म्हणून संभोदतात,आणि चार पायाच्या जीवांचे मांस लाल मांस (Red meat)
असं संभोदतात.
तर मुख्य सांगण्याचा मुद्दा असा की,शाकाहारी आणि मांसाहारी ह्या चार पायांच्या जीवांचा (माणूस धरून) विचार केल्यास आणि निरखून न्याहळल्यास लक्षात येईल
की,
१) शाकाहारी जीव आपल्या ओठाने पाणी पितात.(गाय,म्हैस,घोडे,बकरी,हरण,ऊंदीर,घूशी,हत्ती(सोंडेने म्हणजेच जीभेने नव्हे) आणि मा-णू-स -प-ण-पि-तो) आणि मांसाहारी जीव आपल्या जीभेने पाणी पितात.(वाघ,सिंह,कुत्रा,मांजर,कोल्हे,वगैरे,वगैरे)
२) शाकाहारी जीवांचं आंतडं बरंच लांबीने मोठं असतं.(माणसाचे लहान आंतडं जवळ जवळ ३२ फूट असतं) म्हशीला तर दोन पोटे असतात.
असे करण्यात निसर्गाचा उद्देश असा असावा,पालापाचोळा खाणारा शाकाहारी जीव
बराच वेळ ते अन्न आंतड्यात ठेवू शकावा,(आंतड्याच्या लांबीमुळे)आणि शरिराच्या बाहेर पडे पर्यंत त्यातून पुरंपुर ज्यूस काढून शरिराच्या पोषणाला वापरला जावा.पालापाचोळा मांसा एव्हडा कुजून घाण होत नाही.आंतड्या विषयीच्या अनेक कारणातील हे एक कारण असावं.
आणि गम्मत पहा, माणूस सोडून ईतर कोणत्याही शाकाहारी जीवाच्या समोर,मांसाहार ठेवला तर तो हूंगून मान दुसरीकडे करतो.कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला
दिली नाही.माणूस मात्र जे समोर दिसेल ते खातो.गाय ही देवता मानून गाईची पूजा करणारे लोक जेव्हा पाश्चात्य देशात येतात आणि शाकाहारी असोत किंवा मांसाहारी असोत (गाय,म्हैस,डुकराचे मांस) कसलाही विचार न करता,तावमारून
खातात.(काही अपवाद असतील ही)
३)या उलट मांसाहारी जीवांचं आंतडं फारसं लांब नसतं.जेमतेम चार पाच फूट असतं.मांस पोटात जास्त वेळ राहिल्यास त्याची कुजण्याची प्रतीक्रिया चालूं होऊन नंतर त्याचा शरीराला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून निसर्गाचा हा उद्देश मांसाहारी जीवाना मोठं आंतडं न देण्याचा असावा.हे पण अनेक कारणातील एक कारण असावं.इथं पण ह्या मांसाहारी जीवा समोर पालापाचोळा आणून ठेवला तर तोही मान फिरवून दुर्लक्ष करतो.कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला दिली नाही.
हा झाला आंतड्यातील फरक.
४)आता दांतांचा विचार केल्यास असं दिसून येईल,मांसाहारी आणि शाकाहारी जीवांच्या दांताची रचना,ठेवण,आणि प्रकार,हे मांस आणि पाला चावण्याच्या अनुशंगाने दातांची निर्मीती झाली असावी.मोठ्मोठाले सुळे,कटर्स,दाढा आणि त्यांची ठेवण आणि आकार,तसेच जबडयाचा आकार हे निरखून पाहिल्यास खूप विचार करून निसर्गाने दातांचे डिझाईन केलं आहे असं दिसून येईल.
या दृष्टीकोनातून माणसाचे दांत, आंतडे,जबडा आणि ओठाने पाणी पिण्याचं त्याचं हे कार्य पाहून तो शाकाहारी गटात (group मधे) असण्याच्या संभवाची चांगलीच साक्ष देतो.
तेव्हा थोडक्यात सांगायचे झाल्यास,
अ)लांब आंतड(वीस पंचवीस फुटाच्या वर)असलेले जीव
ब)ओठाने(ओठ पाण्यात बुडवून)पाणी पिणारे जीव
क)दातांची ठेवण,जबडा, उपयुक्तता, पालापाचोळा खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे शाकाहारीच असावेत.
आणि
ड)छोटंसच आंतड(जेमतेम चार पांच फूट) असलेले जीव
ई) जीभेने (जीभ बाहेर काढून) पाणी पिणारे जीव
फ) दातांची ठेवण,जबडा,उपयुक्तता, मांस खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे मांसाहारीच असावेत.
मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?
तेव्हां हे माणसा! विचार कर.केवळ बुद्धि आहे म्हणून निसर्गाविरूद्ध वाटेल ते प्रयोग करू नकोस बाबा,पुढच्या पिढीसाठी आणि आत्ता जगताना संभाळून जग.
श्रीकृष्ण सामंत
वाचन
22279
प्रतिक्रिया
0